मुंबई, 08 जुलै : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी प्रत्येक जण मास्क (mask) घालतो आहे. माणसांच्या चेहऱ्यावर तर तुम्हाला मास्क दिसतीलच मात्र आता माकडही मास्क (monkey wear mask) वापरू लागला आहे. स्वत:च्या हाताने मास्क तयार करून हा मास्क घालून फिरणाऱ्या एका माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. जणू या माकडालाही कोरोनाची भीती वाटू लागली आहे आणि कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी तो मास्क वापरू लागला आहे. इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहू शकतो, फुटपाथवर एका झाडाखाली काही माकडं बसलीत. त्यापैकी एका माकडाला रस्त्यावर एक कापड पडलेलं दिसतं. माकड ते कापड उचलतं. त्याला आपल्या हाताने फोल्ड करतं आणि आपल्या चेहऱ्याभोवती गुंडाळतं. हे कापड चेहऱ्याभोवती गुंडाळून माकड थोडा वेळ चालतंदेखील.
After seeing head scarfs being used as face mask😊😊 pic.twitter.com/86YkiV0UHc
— Susanta Nanda (@susantananda3) July 7, 2020
माकड एखाद्याची नक्कल करण्यात तरबेज असतात. ते हुबेहुब माणसांसारखेच वागतात. सध्या बहुतेक लोक चेहऱ्यावर मास्क घालून किंवा स्कार्फ गुंडाळलेले दिसत आहेत आणि कदाचित अशाच लोकांना पाहून हे माकडदेखील त्यांच्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करत असावं. सुसांत नंदा यांनीदेखील तसंच कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा - अरे बापरे! पोटावर ठेवल्या मधमाशा; वाचा महिलेनं का केलं असं Maternity photoshoot हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहला आहे आणि लाइक केला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत.
Good Demo for every human who still refuse to wear mask
— S Suresh Kumar (@ssureshias) July 7, 2020
जे लोक मास्क घालत नाहीत त्यांनी या माकडाकडून काहीतरी शिकावं असं एका युझरने म्हटलं आहे. तर काही जणांना या माकडाची स्कार्फ घालण्याची आणि त्यानंतर चालण्याची स्टाइल बरीच आवडली आहे.