नवी दिल्ली 20 सप्टेंबर : एका रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) काम करणाऱ्या युवतीसोबत (Female Employees) तीन महिलांचा वाद झाला. तरुणीनं रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्याआधी या महिलांना लसीकरण प्रमाणपत्र मागितलं (Corona Vaccination Certificate) होतं. याच कारणामुळे महिलांना राग आला. यानंतर या तीन महिलांनी रेस्टॉरंटच्या महिला कर्मचारीला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना अमेरिकेच्या (America) मॅनहटव येथील आहे. इथे कोरोना महामारीमुळे लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवल्यावरच लोकांनी हॉटेलमध्ये प्रवेश दिला जातो.
OMG! चक्क सापांसोबत खेळत होता व्यक्ती अन्...; हा Video पाहून येईल अंगावर काटा
याच कारणामुळे रेस्टॉरंटमध्ये काम करणारी 23 वर्षीय तरुणी गेटवरच लोकांचं व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट तपासत होती. ती त्याच लोकांना रेस्टॉरंटमध्ये जाऊ देत होती, ज्यांच्याकडे लसीकरण प्रमाणपत्र आहे. ABC न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, याच दरम्यान Carmine रेस्टॉरंटमध्ये तीन महिला आल्या. महिला कर्मचारीनं त्यांना लसीकरणाचं प्रमाणपत्र मागितलं असता या महिलांना राग आला. त्यांनी या तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
Video shows Carmine's hostess being assaulted over NYC COVID vaccine requirement. https://t.co/mNhCnObOMJ pic.twitter.com/PbQxB84r3b
— Eyewitness News (@ABC7NY) September 17, 2021
इतकंच नाही तर या महिलांना आणखी दोन स्टाफ मेंबर्सलाही मारहाण केली. नंतर या 3 महिलांना पोलिसांनी अटक केली. पीडित तरुणीला या मारहाणीत दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओही (Shocking Video Viral) समोर आला आहे. यात महिला कर्मचाऱ्याला मारहाण करतानाची घटना कैद झाली आहे.
प्लॅटफॉर्मवरच तरुणाच्या पाठीवर बसली महिला अन्...; VIDEO पाहून संतापले नेटकरी
व्हिडिओमध्ये दिसतं, की तीन महिला एका तरुणीला मारहाण करत आहेत. आसपास उभा असलेले लोक तिचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी गोंधळ उडालेला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.