जेव्हा आपल्याला बॉस ऑफिसमध्ये रागावतो तेव्हा आपण काय करतो?, एकतर आपले बॉससोबत वाद होतात किंवा आपली नोकरी वाचवण्यासाठी स्वत:चा राग शांत करतो. परंतु असाच एक किस्सा थायलंडमधील एका महिला कर्मचाऱ्याबरोबर घडल्यावर तिनं थेट कोट्यवधी रूपयांच्या गोदामाला आग लावली आहे.
थायलंडमध्ये बॉस रागावल्यावर नाराज झालेल्या महिला कर्मचाऱ्याने तेल गोदामाला आग लावलेली आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार महिलेने ही आग काही कागद आणि लायटरने लावली होती. त्यानंतर Fuel Container पेटलं.
38 वर्षीय Ann Sriya असं या कर्मचारी महिलेचं नाव आहे. डेली मेलने जारी केलेल्या रिपोर्टनुसार ती आपल्या बॉसच्या सततच्या तक्रारी आणि तणावपूर्ण वातावरणामुळं वैतागली होती.
या महिला कर्मचाऱ्याच्या अशा वर्तवणूकीमुळं नाखोन पाथोम प्रांतात प्रपाकोर्न ऑयल गोदामात भीषण आग लागली. त्यामुळं या परिसरात चांगलीच खळबळ या महिलेच्या वर्तवणुकीमुळे नाखोन पाथोम प्रांतात प्रपाकोर्न ऑयल गोदामात भीषण आग लागली. त्यामुळं या परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर संपूर्ण गोदाम जळून खाक झालं होतं. पेटलेली ही आग विझवण्यासाठी 40 अग्निशमन दलाच्या गाड्यांना बोलवावं लागलं. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.उडाली होती. त्यानंतर संपूर्ण गोदाम जळून खाक झालं होतं. पेटलेली ही आग विझवण्यासाठी 40 फायर टेंडरला बोलवावं लागलं. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
आग लागलेल्या कंटेनरमध्ये हजारो गॅलन तेल होतं. या आगीच्या घटनेमुळे कंपनीला जवळपास 9 कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता आरोपी असलेल्या Ann Sriya ला पोलिसांनी अटक केली असून तिनेही केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आरोपी महिलेचा दावा आहे की तिचा बॉस तिला कामासाठी त्रास देत होता. रोजच्या तणावाला कंटाळून तिने बदला घेण्याचा विचार केला आणि गोदामाला आग लावली.