जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अचानक गावाबाहेर उगवलं 'कोंबड्याचं झाड'; आता रातोरात उद्धवस्त होताच गावकऱ्यांचा हिरमोड

अचानक गावाबाहेर उगवलं 'कोंबड्याचं झाड'; आता रातोरात उद्धवस्त होताच गावकऱ्यांचा हिरमोड

अचानक गावाबाहेर उगवलं 'कोंबड्याचं झाड'; आता रातोरात उद्धवस्त होताच गावकऱ्यांचा हिरमोड

या गावासाठी हे चिकन ट्री खूपच प्रिय होतं. याचा आकार कोंबड्याप्रमाणे होता. मागील २० वर्षांपासून हे झाड या गावाची ओळख बनलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : अनेक ठिकाणांची ओळख तिथे असलेल्या विशेष काही गोष्टींमुळे असते. उदाहरणार्थ आग्रा आठवलं की सहाजिकच डोक्यात ताजमहल (Tajmahal) येतो. तसंच इंग्लंडच्या एका छोट्याशा शहराची ओळख होती चिकन ट्री (Chicken Tree). हे झाड कुठून आलं आणि कोणी लावलं हे कोणालाच माहिती नाही. मात्र, हे झाड या शहराची ओळख बनलं होतं. झाडाचा आकार एखाद्या कोंबड्याप्रमाणे होता. मात्र, 20 वर्षांनंतर आता या शहराची ही ओळख अचानक नष्ट झाली. लोकांचं म्हणणं आहे, की कोणीतरी मुद्दाम या झाडाचं नुकसान केलं. मात्र एक्सपर्टचं म्हणणं वेगळंच आहे. वय फक्त 3 पण इतकं फास्ट! तरुणांनाही लाजवेल असं चिमुरड्याचं करतब; VIDEO VIRAL या गावासाठी हे चिकन ट्री खूपच प्रिय होतं. याचा आकार कोंबड्याप्रमाणे होता. मागील २० वर्षांपासून हे झाड या गावाची ओळख बनलं होतं. मात्र आता हे झाड उद्ध्वस्त झालं आहे. या झाडामुळे आजूबाजूची अनेक गावे आपल्यावर जळत असल्याचं ग्रामस्थ सांगतात. यामुळे कोणीतरी जाणूनबुजून याची नासधूस केली, असा त्यांचा आरोप आहे. मात्र वाऱ्यामुळे झाडाची अवस्था बिकट झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता झाडाचा आकार बदलला आहे. ते आता कोंबडीसारखे दिसत नाही.

News18

हा नाश होण्यापूर्वी याला उत्तरेचा देवदूत म्हणून ओळखलं जात असे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक ठेकेदाराने हे नुकसान केलं असावं. या ठेकेदाराला झाड तोडून रस्ता तयार करायचा होता. पण हे झाड लोकांना इतकं प्रिय होतं की कुणीही त्याला परवानगी दिली नव्हती. अशा स्थितीत त्याने हे झाड जाणूनबुजून नष्ट केलं असावं, असं त्यांचं म्हणणं आहे. आता या झाडाची दुरवस्था पाहून लोक दुःखी झाले आहेत.

News18

Video :दुर्दैवी! आभाळ समजून इमारतीच्या काचेला पक्ष्यांच्या थव्याची धडक,34 मृत्यू

लोक म्हणतात की त्यांच्यासाठी ते फक्त झाड नव्हतं. ते त्यांचा मित्र, त्यांचं घर आणि त्यांची ओळख होतं. गावात एंट्री घेताना हे झाड हसत हसत स्वागत करतं, असं गावकऱ्यांना वाटत होतं. पण आता त्यांना याची कमी जाणवते. या झाडाचे आधीचे काही फोटो पाहिल्यावर ते खरोखरच कोंबड्यासारख्या आकाराचं वाटलं. हे झाड कोणी लावलं याची माहिती स्थानिकांना नाही, मात्र आता ते उद्ध्वस्त झाल्याने त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात