नवी दिल्ली 15 मे : टीव्ही चॅनेलचे वार्ताहर हे बऱ्याचदा घटनास्थळी जाऊन रिपोर्टिंग करत असतात. असंच एका कुत्र्याच्या चोरीच्या (Dog Theft) बातमीचं घटनास्थळावरून रिपोर्टिंग करताना त्याच कुत्र्याची रिपोर्टरनं चोराच्या हातून सुटका केल्याची दुर्मिळ घटना बोस्टन (Boston) इथं घडली आहे. हा विलक्षण अनुभव आलेल्या रिपोर्टरचं नाव ज्युलियाना माझा (Juliana Mazza) असं असून ती बोस्टनच्या डब्ल्यूएचडीएच-टीव्हीची (WHDH TV) रिपोर्टर आहे. ट्विटरवर तिनं हा सगळा किस्सा व्हिडिओसह शेअर केला आहे.
9 मे रोजी डब्ल्यूएचडीएच-टीव्हीची रिपोर्टर ज्युलियाना माझा कॅमेरामन जॉन ग्रिसवेरे याच्यासह केंब्रिज भागातून एका कुत्र्याच्या चोरीबाबत बातमी देत होते. टायटस (Titus) नावाच्या13 वर्षाच्या जर्मन शॉर्ट हेअर्ड पॉइंटर(German Short Haired Pointer)जातीच्या कुत्र्याची चोरी झाल्याची बातमी त्यांनी दिली. 7 मे रोजी हा कुत्रा त्याच्या मालकाच्या गाडीतून चोरीला गेला होता. पांढऱ्या रंगाच्या या कुत्र्याच्या अंगावर आणि डोक्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असून त्याच्या गळ्यात त्याचं नाव असलेली केशरी रंगाचीकॉलर आहे, अशी माहिती त्यांनी बातमीत सांगितली. चोरी नेमकी कुठून झाली याची माहिती देताना ते त्या पार्किंगच्या ठिकाणाहून बातमी देत होते. त्याचवेळी टायटससारखाच दिसणारा कुत्रा घेऊन चालत येणाऱ्या एका व्यक्तीकडे तिचं लक्ष गेलं. तिनं लगेच त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली.
काही वेळातच त्यानं आपणच त्या कुत्र्याची चोरी केल्याचं कबुल केलं. दरम्यान, ती त्या व्यक्ती बरोबर बोलत असताना कॅमेरामननं हे सगळं शूट करावं, यासाठी ती हातवारे करत होती. अखेर त्याचं लक्ष गेलं आणि ही सगळी घटना लोकांपर्यंत पोहोचली. पोलीस येईपर्यंत ती त्या माणसाशी संवाद साधत राहिली आणि नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यानंतर कुत्र्याला त्याच्या मालकाच्या म्हणजेच ग्रेग सिस्झिक्युविक्सयाच्या ताब्यात दिलं. हा सगळा व्हिडिओ ज्युलियाना माझा हिनं ट्विटरवर शेअर केला असून ही संपूर्ण घटना त्यात पाहायला मिळते.
WHAT ARE THE ODDS?! My photog John & I were covering a stolen dog story in Cambridge when all of a sudden we spot THE DOG!!! We were able to convince the suspect to give us the pup & kept him engaged until @CambridgePolice arrived shortly after. We are SO HAPPY Titus is safe! ❤️ https://t.co/FPg2Pfsqc2 pic.twitter.com/s1ESKLiqIb
— Juliana Mazza (@julianamazzatv) May 8, 2021
या सगळ्या घटनेबद्दल ‘इनसाइड एडिशन’शी बोलताना ज्युलियानानं सांगितलं की, ‘टायटस सारख्याच दिसणाऱ्या कुत्र्याला घेऊन चालत येणाऱ्या व्यक्तीला बघून पहिल्यांदा माझ्या मनात विचार आला की, त्याच्या नावाचा टॅग कसा बघता येईल. त्यासाठी तिनं त्या कुत्र्याला हात लावण्याची परवानगी घेत, गळ्यातील पट्टा बघून नावाची खात्री करून घेतली. ही खात्री पटल्यानंतर तिनं त्या व्यक्तीला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि अवघ्या दोन अडीच मिनिटात आपणच त्याला नेल्याचं या व्यक्तीनं कबुल केलं. दरम्यान तिनं पोलिसांना कळवलं आणि काही मिनिटातच पोलीस तिथे दाखल झाले आणि त्या व्यक्तीला त्यांनी ताब्यात घेतलं.
WHAT ARE THE ODDS?! My photog John & I were covering a stolen dog story in Cambridge when all of a sudden we spot THE DOG!!! We were able to convince the suspect to give us the pup & kept him engaged until @CambridgePolice arrived shortly after. We are SO HAPPY Titus is safe! ❤️ https://t.co/FPg2Pfsqc2 pic.twitter.com/s1ESKLiqIb
— Juliana Mazza (@julianamazzatv) May 8, 2021
कुत्र्याला घेऊन जाणाऱ्या या व्यक्तीचं नाव काईल गॅरीपी असं असून हा कुत्रा कारमध्ये उभा राहून भुंकत होता, त्यामुळं त्याला बाहेर फिरायचं आहे असं वाटल्यानं आपण त्याला कारबाहेर काढलं आणि फिरवायला नेलं, असं चोरानं सांगितलं. आपण त्याचं अपहरण केलं नव्हतं तर ही आपली चूक होती, अशी सफाई त्या व्यक्तीनं दिली. पण दुसऱ्याच्या कारमध्ये विना परवानगी घुसण्याचा आरोप ठेवत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, टायटसचा मालक ग्रेग सिस्झिक्युविक्सही तिथं पोहोचला. ग्रेगनं अतिशय आनंदानं टायटसला मिठी मारली. टायटसही आपल्या मालकाला बघितल्यावर अतिशय आनंदी झाला होता.‘तो चोर परत तिथेच आला आणि तुम्ही लोक तिथं होतात त्यामुळं टायटस परत मिळाला. मी खूप आनंदी आहे,’असं ग्रेगयानं ज्युलियानाला म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Owner of dog, Reporter, Viral