नवी दिल्ली 05 जानेवारी : आजकाल तरुणांमध्ये स्टंट करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. तुम्हाला अगदी छोट्या मोठ्या गल्लीतही अनेक स्टंटमॅन दिसतील. काहींनी साईकल स्टंट करायला आवडतं, काहींना बाईक स्टंट तर काहींनी कार स्टंट. यातील अनेक लोकांचा स्टंट यशस्वीही ठरतात मात्र काहींचे स्टंट फेलही होतात. सोशल मीडियावर स्टंट करताना घडलेल्या हैराण करणाऱ्या घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Stunt Video) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. VIDEO - मगरीने केअरटेकरलाच पाण्यात खेचलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा अनेकदा चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हिरो किंवा खलनायक अगदी वेगात कार चालवत असतात आणि कधी कधी गाडीतून अचानक धूर निघू लागतो. एकसोबतच ब्रेक आणि एक्सीलेरेटर दोन्ही दाबल्याने कारवरील दाब वाढतो आणि यामुळे धूर निघतो. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही काहीसं असंच पाहायला मिळतं. मात्र हा स्टंट यात फेल झालेला आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती स्टंट करण्यासाठी अगदी वेगात कार चालवत आहे. मात्र काही अंतरावर जाताच या कारचे दोन भाग होतात. मात्र सुदैवाने यात या व्यक्तीला काहीही दुखापत होत नाही. तो आरामात सीटवरच बसून राहतो. हा व्हिडिओ कुठला आहे, हे समजू शकलं नाही. मात्र, हा अतिशय हैराण करणारा आहे. स्टंट करताना कारचेच दोन तुकडे झाल्याचे व्हिडिओ तुम्ही कदाचितच पाहिले असतील.
भारतीय नारी जगात भारी! फक्त केसांनीच खेचली तब्बल 12000 किलोची बस; पाहा VIDEO
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ superautovip नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 1 लाख 14 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.