मराठी बातम्या /बातम्या /Viral /विनामास्क खरेदीसाठी पोहोचलेल्या महिलेचा पराक्रम; स्वतःचे कपडे काढून चेहऱ्याला बांधले अन्..., VIDEO VIRAL

विनामास्क खरेदीसाठी पोहोचलेल्या महिलेचा पराक्रम; स्वतःचे कपडे काढून चेहऱ्याला बांधले अन्..., VIDEO VIRAL

महिलेनं मास्क घातलेलं नसल्याने दुकानदाराने तिला मास्क घालण्यास सांगितलं. तिला या गोष्टीचा भरपूर राग आला. तिने लगेचच आपला ड्रेस काढला

महिलेनं मास्क घातलेलं नसल्याने दुकानदाराने तिला मास्क घालण्यास सांगितलं. तिला या गोष्टीचा भरपूर राग आला. तिने लगेचच आपला ड्रेस काढला

महिलेनं मास्क घातलेलं नसल्याने दुकानदाराने तिला मास्क घालण्यास सांगितलं. तिला या गोष्टीचा भरपूर राग आला. तिने लगेचच आपला ड्रेस काढला

नवी दिल्ली 05 जानेवारी : कोरोनाचा कहर अजूनही कायम आहे. जगभरातील इतर देशांप्रमाणेच भारतातही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant in India) वेगाने प्रसार होत आहे. यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) या नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र अनेक लोक हे नियम पायदळी तुडवताना दिसतात आणि जेव्हा त्यांच्यावर दबाव टाकला जातो, तेव्हा ते विचित्र कृत्य करू लागतात. अशीच एक घटना आता अर्जेंटिनामधून समोर आली आहे. यात एका महिलेनं मास्क जवळ नसल्याने आपले कपडे काढूनच तोंडाला बांधले (Woman Wear Dress As Mask).

VIDEO - मगरीने केअरटेकरलाच पाण्यात खेचलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा

द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, पश्चिम अर्जेंटिनाच्या मेंडोजामधील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये नुकतीच एक अशी घटना घडली, जी पाहून सगळेच हैराण झाले. गॉन्डॉय क्रूजच्या एका आईस्क्रीमच्या दुकानात पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी उभा होते. इतक्यात एक महिला तिथे आली. या महिलेनं मास्क घातलेलं नसल्याने दुकानदाराने तिला मास्क घालण्यास सांगितलं.

महिलेला या गोष्टीचा भरपूर राग आला. तिने लगेचच आपला काळा ड्रेस काढला (Woman Removed Dress to Wear as Face Mask) आणि सर्वांसमोर केवळ अंतर्वस्त्रावरच उभी राहिली. यानंतर तिने आपला ड्रेसच मास्कप्रमाणे चेहऱ्यावर बांधला. मास्क बांधताना रागात ती दुकानदाराला म्हणत होती, की आता मला शांततेत मास्क बांधू द्या. हे पाहून दुकानदारही हैराण झाला आणि त्याने या महिलेला योग्य मास्क घालून येण्यास सांगितलं.

भारतीय नारी जगात भारी! फक्त केसांनीच खेचली तब्बल 12000 किलोची बस; पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शेजारीच उभं असलेलं कुटुंब हे सर्व पाहून हैराण झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेसोबतच तब्बल 11 आणखी लोक होते. या सर्वांनी तिला आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी पाठवलं होतं. महिलेचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Face Mask, Shocking video viral