मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला

तुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला

पुरुषांना कंट्रोल करण्याचं महिलांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य- Canva)

पुरुषांना कंट्रोल करण्याचं महिलांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य- Canva)

महिला महिलांना पुरुषांना कंट्रोल करण्याचे ऑनलाईन धडे देते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

सिडनी, 01 डिसेंबर : माझा नवरा किंवा माझा बॉयफ्रेंड माझं काहीच ऐकत नाही, अशी तक्रार कित्येक महिलांची असते. आपलं सर्वकाही ऐकणारा, आपण म्हणू ते करणारा, आपले सर्व हट्ट पुरवणारा जोडीदार आपल्याला हवा, असं कुणाला वाटणार नाही. पण असा जोडीदार सर्वांना मिळतोच असा नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल न ऐकणाऱ्या अशा पार्टनरलाही कंट्रोल कसं करायचं याचे धडे देते एक महिला.

नवरा असो वा बॉयफ्रेंड महिला आपल्या पार्टनरला कंट्रोल करतात असं वारंवार म्हटलं जातं. पण महिला पुरुषांना कंट्रोल करतात म्हणजे नेमकं काय, हे कसं? हेच शिकवते ती एक महिला. हो आपल्या पार्टनरला कसं कंट्रोल करायचं याचे धडे एक महिला इतर महिलांना देते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याचे ती ऑनलाइन क्लासेस घेते आणि त्यासाठी फीसुद्धा चार्ज करते.

मारग्रीटा नजॅरेंका असं या महिलेचं नाव आहे. 34 वर्षांची मारग्रीटा ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत राहते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना पुरुषांना आपल्य़ा मुठीत ठेवण्याचे उपाय सांगते. मारग्रीटा महिलांना फेमिनिज्मचे धडे देतो. पुरुषांसोबत भांडण्याऐवजी त्यांना प्रेमाने कंट्रोल कसं करायचं हे शिकवते.

हे वाचा - दारू पिऊन रस्त्यावर चालत राहिले; फिरता फिरता नशेत थेट फॉरेनला पोहोचलं कपल

मारग्रीटाने सांगते, महिला आपल्या फेमिनिटीचा हुशारीने वापर करून आपल्या पार्टनरकडून जे हवं ते करून घेऊन शकतात. महिलांचा व्यवहार हरण, गाय, घोड्यांसारखा असतो. हरणात खूप ऊर्जा असते आणि महिलांनीही काही चुकीचं होणार असल्याचं वाटत असेल तेव्हा तसंच बनायला हवं. तसंच गाय जशीत कधीच थकत नाही, तसं त्यांनीही धकू नये. घोड्यासारखं प्रभावी राहायलं हवं.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार मारग्रीटा महिलांना आपण महिला असलेल्या गुणांचा वापर करायला सांगते. जेणेकरून पुरुष त्यांचं ऐकतील. ज्या गोष्टी पुरुष बदलूच शकत नाही, त्याची तक्रार करत बसायचं नाही आणि त्यांच्या चांगलेपणाचं कौतुक करा. अशामुळे ते प्रभावित होतात.

हे वाचा - नवरीबाईने नवरदेवाकडे केला असा हट्ट की झाली त्याची 'कोंडी'; ऐन लग्नात बोलवावे लागले पोलीस

यासाठी तिने ऑनलाइन कोर्स सुरू केला आहे. यासाठी ती पैसेही घेते. तिच्या पैसे कमवण्याच्या या मार्गामुळे ती चर्चेत आली आहे.

First published:

Tags: Couple, Lifestyle, Relationship, Viral, Viral news, Wife and husband