मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरीबाईने नवरदेवाकडे केला असा हट्ट की झाली त्याची 'कोंडी'; ऐन लग्नात बोलवावे लागले पोलीस

नवरीबाईने नवरदेवाकडे केला असा हट्ट की झाली त्याची 'कोंडी'; ऐन लग्नात बोलवावे लागले पोलीस

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

नवरीबाईचा हट्ट पूर्ण करणं नवरदेवासाठी सोपं नव्हतं. अखेर लग्नात पोलिसांना बोलवण्याची वेळ आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 28 नोव्हेंबर : आपल्या लग्नाबाबत बऱ्याच जणांनी काही स्वप्नं रंगवलेली असतात. विशेषतः तरुणींना आपल्या लग्नात खूप काही करण्याची हौस असते. अशीच हौस एका नवरीबाईला होती. तिने त्यासाठी नवरदेवाकडे हट्ट केला. पण नवरीबाईचा हट्ट पूर्ण करणं नवरदेवासाठी सोपं नव्हतं. त्याची कोंडी झाली होती. अखेर नवरीचा हट्ट पुरवताना ऐन लग्नात पोलिसांची एंट्री झाली. उत्तर प्रदेशच्या संभलमधील हे लग्नाचं प्रकरण आहे.

राम किशन असं नवरदेवाचं नाव आहे. 21 वर्षांच्या रवीनासोबत त्याचं लग्न ठरलं होतं. लग्नाबाबत रवीनाचं एक स्वप्न होतं जे तिने रामला सांगितलं.  आपली इच्छा तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडे व्यक्त केली. तिला  नवरी रवीनाला आपल्या लग्नाच्या वरातीत डीजे आणि आपला घोड्यावरून येणारा नवरदेव हवा होता. आता तुम्ही म्हणाल, बस्सं इतकंच... हे स्वप्न तर काय कुणीही पूर्ण करेल किंबहना लग्नात हे असतंच की...पण तुम्हाला वाटतं तितकं हे सोपं नाही. कारण राम आणि रवीना हे दलित होते. ज्या लोहामई गावात या दोघांचं लग्न होणार होतं तिथं उच्च जातीने दलितांच्या लग्नात काही प्रतिबंध लावले आहेत.

हे वाचा - बोंबला! हनीमूनच्या रात्री नवरीला पाहताच हादरला; सलग 5 दिवस झोपलाही नाही नवरा

पण काही केल्या नवरीची लग्नाची इच्छा तर पूर्ण करायची आहे. यासाठी नवरीबाईच्या कुटुंबाने पुढाकार घेतला. रवीनाचे काका राजेंद्र वाल्मिकी यांनी संभलचे जिल्हाधिकारी मनीष बन्सल यांना निवेदन दिलं होतं. काही उत्च जातीचे लोक दलि समाजातील लोकांना डीजे आणि घोड्यासह वरात काढू देणार नाहीत, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आणि या लग्नसोहळ्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली. यानंतर संभळ पोलिसांची फौजच लग्नाला आली.

इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार संभलचे पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी शुक्रवारी रात्री लग्न कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडावं म्हणून आसपासच्या पोलीस ठाण्यातील पोलीस दल पाठवले.  वरातीत 44 पोलीस कॉन्स्टेबल, 14 सब इन्स्पेक्टर, एक इन्स्पेक्टर आणि एत सर्किल ऑफिसर होता. पोलिसांनी या नवदाम्पत्याला लग्नाचं गिफ्ट म्हणून 11,000 रुपयांचा आहेरही दिला.

हे वाचा - Wedding Cake वरून लग्नात राडा! नवरदेवाने उचललं धक्कादायक पाऊल, नवरी हादरली

यूपी पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत वरात निघाली आणि दलित दाम्पत्याचा लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडला. एसपी चक्रेश मिश्रा म्हणाले, "आम्ही कुटुंबाच्या मागणनुसार सुरक्षा दिली. लग्न अगदी शांत आणि नीट पार पडलं"

First published:

Tags: Bridegroom, Marriage, Uttar pradesh, Viral, Wedding