रिगा, 28 नोव्हेंबर : तुम्हाला बऱ्याच लव्ह स्टोरी, डेटिंग स्टोरी किंवा कपलचे किस्से माहिती असतील. अशाच एका कपलचा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका तरुणीने स्वतःच आपल्या पहिल्या डेटिंगचा एक विचित्र किस्सा सांगितला आहे. एका अनोळखी व्यक्तीला ही तरुणी भेटली. त्यानंतर दोघंही दारू प्यायले. त्यांना दारू इतकी चढली की नशेत ते त्यादिवशी खूप फिरले. इतके की हे कपल थेट फॉरेनला पोहोचलं.
22 वर्षांची एलेविना परकरे, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर आपल्या पहिल्या डेटिंगचा अनुभव शेअर केला आहे.
एलविनाने सांगितलं की 13 नोव्हेंबरचा तिचा दिवस कामाच्याबाबतीत खूप खराब होता. त्या दिवशी सर्वकाही सोडून पळून जावं असं तिला वाटत होतं. वाइनची बाटली घेऊन ती आपल्या घरातील किचनमध्ये बसली होती. त्यावेळी तिने मिस्ट्री मॅनला मेसेज केला. मला एक समस्या आहे, तू माझं ऐकशील का. यावर त्या व्यक्तीने हो नक्कीच असा रिप्लाय दिला. आपण या व्यक्तीला काही कार्यक्रमात भेटलो होतो पण तिच्याशी फार बोलणं झालं नव्हतं, असंही एलविना म्हणाली.
हे वाचा - नवरीबाईने नवरदेवाकडे केला असा हट्ट की झाली त्याची 'कोंडी'; ऐन लग्नात बोलवावे लागले पोलीस
यानंतर दोघं भेटले. एकत्र बसून दारू प्यायले. दारू प्यायल्यानंतर नशेतच त्यांनी फिरण्याचा प्लॅन केला. आता फिरणं म्हणजे अगदी जवळपास नव्हे तर फॉरेन. जगातील सर्वात रोमँटिक शहर पॅरिसमध्ये जाण्याचं त्यांनी ठरवलं. फ्लाइट पकडली आणि ते पॅरिसला पोहोचलेसुद्धा.
पॅरिसमध्ये या कपलने 24 तास एकत्र घालवले. दोघंही रस्त्यावर फिरले. आयफिल टॉवरखाली बसून ते पुन्हा दारू प्यायले. या पूर्ण दिवसात ते बिलकुल झोपले नाही. 13 नोव्हेंबरला पहिल्यांदाचा भेटून पॅरिसला गेलेलं हे कपल 15 नोव्हेंबरला लातवियाला परतलं. पॅरिस फिरून आलेल्या या कपलची नंतर काही फार भेट झाली नाही. एवेलिना म्हणाली, त्या व्यक्तीला भेटताच क्षणी ती त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाली.
हे वाचा - 'मृत्यू चालेल पण अशी गर्लफ्रेंड नको', VIDEO पाहून सांगा तुम्हालाही असंच वाटतंय का?
एवेलिना सध्या लातवियाची राजधानी रिगामध्ये राहत आहे. तिने आपल्या पॅरिस प्रवासाचा व्हिडीओ तिने टिकटॉकवर पोस्ट केला आहे. या डेटला तिने सर्वात रोमँटिक डेट म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Love, Love story, Viral, Viral news