मराठी बातम्या /बातम्या /Viral /Ratan Tata unknown Facts : आई-वडील नाही तर 'या' खास व्यक्तीनंं सांभळलं रतन टाटांना

Ratan Tata unknown Facts : आई-वडील नाही तर 'या' खास व्यक्तीनंं सांभळलं रतन टाटांना

रतन टाटा

रतन टाटा

आज त्यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त काही रंजक गोष्टी पाहू

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 28 डिसेंबर : रटन टाटा 28 डिसेंबरला त्यांचा 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांची गणणा देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींमध्ये केली जाते. रतन टाटा हे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहे. रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये मुंबई झाला. रतन टाटा नेहमीच आपल्या साधेपणा आणि नम्रतेसाठी ओळखले जातात. ते शिक्षणासाठी अनेक मुलांना स्कॉलशीप देतात. तसेच त्यांच्या अनेक ट्रस्ट आहेत, ज्या गरजूंना मदत करतात. उद्योगपतीसह ते समाजकारण देखील त्यांचं नाव नेहमीच समोर आलं आहे.

रतन टाटा यांना भारतातील सर्वात नम्र व्यापारी म्हणूनही ओळखले जाते. बिझनेस टायकून असण्यासोबतच रतन टाटा हे मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहेत. त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला माहित नसाव्यात.

हे ही पाहा : महिलेचे एक लाख रुपये घेऊन पळाला माकड आणि... पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का

चला तर आज त्यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त काही रंजक गोष्टी पाहू

रतन टाटा

टाटा हे गुजरातच्या भांडवलदार कुटुंबातील होते, परंतु असे असूनही त्यांचे बालपण फारसं चांगलं नव्हतं. यामागचं कारण म्हणजे त्यांचे पालक एकत्र राहत नव्हते.

टाटा खूप लहान होते जेव्हा त्यांचे पालक मतभेदांमुळे वेगळे राहू लागले. त्यामुळे मग रतन टाटा यांचे संगोपन त्यांच्या आजीने केलं.

रतन टाटा १० वर्षांचे होते, जेव्हा यांचे आई-वडील वेगळे झाले, ज्यानंतर त्यांची आजी नवाजबाई यांनी त्यांचे पालनपोषण केलं.

टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे रतन टाटा हे मुलगा आहेत.

रतन टाटा यांनी वयाच्या 25 व्या वर्षी कंपनीत आपले करिअर सुरू केले. आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ते 1959 मध्ये कॉर्नेल विद्यापीठात गेले.

1962 मध्ये भारतात परतण्यापूर्वी त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये जोन्स आणि इमन्ससोबत काम केलं आहे.

रतन टाटा 1962 मध्ये टाटा ग्रुपमध्ये सामील झाले आणि त्यांची पहिली नोकरी त्यांनी जमशेदपूरमधील टाटा स्टील विभागात केली.

1975 मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटचा कोर्स केला. ज्यानंतर रतन टाटा 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले.

रतन टाटा यांनी भारतातील पहिले स्वदेशी वाहन टाटा इंडिका बनवले. ज्यामुळे स्वत:ची गाडी घेण्याचं स्वप्न असलेल्या अनेक भारतीयांच स्वप्न पूर्ण करण्यात मदत झाली.

भारताची ही पूर्णपणे स्वदेशी कार 1998 च्या ऑटो एक्स्पो आणि जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. टाटा इंडिका पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह उपलब्ध होती.

रतन टाटा यांना उड्डाणाची खूप आवड आहे. 2007 मध्ये F-16 फाल्कन प्लेन उडवणारे ते पहिले भारतीय ठरले.

First published:
top videos

    Tags: Ratan tata, Social media trends, Tata group, Top trending, Viral