Home /News /viral /

...आणि अचानक आकाशात दिसलं 'फायर टॉर्नेडो', पहिल्यांदाच कॅमेऱ्यात टिपला दुर्मिळ VIDEO

...आणि अचानक आकाशात दिसलं 'फायर टॉर्नेडो', पहिल्यांदाच कॅमेऱ्यात टिपला दुर्मिळ VIDEO

कधी हवेत आग लागलेली पाहिली आहे, फायर टॉर्नेडोचा हा दुर्मिळ VIDEO मिस करू नका.

    न्यूयॉर्क, 18 ऑगस्ट : एकीकडे कोरोनाचे (Coronavirus) संकट असताना दुसरीकडे अमेरिकेत मोठी आग लागली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात अशाच एका जंगलात आग लागल्यामुळे एक दुर्मिळ 'फायर टॉर्नेडो' (fire tornado) पाहायला मिळाले. येथील लॉयल्टन (Loyalton) भागातील जंगलातील आगीमुळे एक विशेष ढग तयार झाले होते. यातच आकाशात अचानक फारच दुर्मिळ 'फायर टॉर्नेडो' दिसला. फायर टॉर्नेडो तेव्हा येतात जेव्हा अग्निच्या उष्मामुळे आग आणि धूर बाहेर पडतात, त्यानंतर त्यास चक्रीय वाऱ्यांशी जोडले जाते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, लोक आता 2020मध्ये फक्त एलियन पाहणे बाकी असल्याचे म्हणत आहेत. वाचा-8 वर्षांच्या दिव्यांग मुलीनं केलं जिमनॅस्टीक; VIDEO पाहून भलेभलेही ही झाले थक्क वाचा-ज्या टॅंकवर चीनला होता सर्वात जास्त विश्वास, तोच अवघ्या 30 सेकंदात बुडाला यूएस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, फायर टॉर्नेडोचे प्रमुख कारण म्हणजे उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलांत लागलेली आग. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉन जॉन्सन म्हणाले की याला 'फायरनेडो' म्हणून देखील ओळखले जाते आणि हे चित्र फार दुर्मिळ परिस्थितीत दिसते. फायर टॉर्नेडो हे पूर्णपणे आगीने भरलेले असते, आणि याच्यात सर्व काही भस्म करण्याची क्षमता आहे. ते म्हणाले की अग्निशमन दलाच्या पथकाला फायर टॉर्नेडोचा सामना करणे कठिण जाणार आहे. वाचा-शार्कच्या जबडयात होता पत्नीचा पाय, नवऱ्यानं पाण्यात मारली उडी आणि...; पाहा VIDEO जॉन्सन म्हणाले की या प्रकारच्या आगीत फायर टोर्नेडो 30 हजार फूटांहून अधिक वर पोहचतात. यावेळी 110 ताशी वेगाने वारे 135 मैलांपर्यंत जाऊ शकतात. ते म्हणाले की, याआधी 2018 मध्ये फायर टॉर्नेडो कॅलिफोर्नियामध्ये दिसले होते. या आगीत आतापर्यंत लोयल्टनमधील 20 हजार एकर जंगल भस्मसात झाले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या