सिडनी, 16 ऑगस्ट : शार्क म्हणजे सगळ्यात भीतीदायक प्राणी. शार्कच्या तावडीतून तुम्ही सुटलात तर तुम्ही नशीबवान आहात, असंच समजा. मात्र ऑस्ट्रेलियात एका महिलेसाठी तीचा नवरा देवासारखा धावून आला. ऑस्ट्रेलियातील व्हाईट शार्कने एका महिलेचा सर्फिंग करत असताना पाय पकडला. शार्कला पाहून नवरा-बायको दोघंही घाबरले मात्र पतीनं प्रसंगावधान दाखवत, पाण्यात उडी मारली आणि हाताने शार्कवर हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी जबर जखमी झाली असली, तरी तिचे प्राण वाचवण्यात यश आले.
प्रत्येक पत्नीसाठी आपला नवरा हिरो असतो. मात्र या घटनेत या महिलेचा पती सुपरहिरो निघाला. सिडनी मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही घटना न्यू साउथ वेल्स प्रांतातील पोर्ट मॅकरीनमधील शेली कोस्ट येथे घडली. Mike Rapley आणि त्यांची पत्नी Chantelle Doyle सर्फिंग करत होते. यावेळी अचानक साडेसहा फूट लांब पांढ white sharkने डोयलेचा उजवा पाय धरला. या हल्ल्यामुळे डोयले पाण्यात पडली. यावेळी नवरा माईककडे कोणतेही शस्त्रे नव्हते म्हणून त्याने शार्कवर उडी मारली आणि त्याच्या डोक्यात व पाठीवर हल्ला केला.
वाचा-...आणि डोळ्यांदेखत कोसळली वीज, कॅमेऱ्यात कैद झाला अंगावर शहारे आणणारा VIDEO
मिळालेल्या माहितीनुसार, शार्कनं जेव्हा बोयलेवर हल्ला केला तेव्हा माइककडे त्याच्यावर वार करण्यासाठी काहीच नव्हते. मात्र माइकने धैर्याने ही परिस्थिती हाताळली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शार्क घाबरला आणि त्याने डोयलेचा पाय सोडला. त्यानंतर माइकने पत्नीला समुद्रातून बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या पत्नीला रुग्णालयात नेण्यात आले. डोयलेच्या पायला गंभीर दुखापत झाली आहे.
वाचा-नदी पार करताना घसरला पाय, क्षणार्धात पाण्याच्या प्रवाहात मुलं गायब
वाचा-पेट्रोल परवडत नाही? नो टेंशन! आता आली पाण्यावर चालणारी गाडी, पाहा हा VIDEO
सर्फ लाइव्ह सेव्हिंग न्यू साउथ वेल्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टीव्हन पियर्स यांनी माइकचे कौतुक करत असे म्हटले आहे की खर्याी अर्थाने त्याने धैर्याचे काम केले आहे. या घटनेनंतर बीच बंद करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात न्यू साउथ वेल्समध्ये शार्कने एका 15 वर्षाच्या मुलाची शिकार केली होती. दोन महिन्यांत हा शार्कचा तिसरा हल्ला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shark