बीजिंग, 18 ऑगस्ट : जवळजवळ सर्वच देशांशी सीमवाद उकरून काढणाऱ्या चीनला एक मोठा धक्का बसला आहे. एकीकडे चीन आशिया खंडातील, विशेषत: दक्षिण चीन समुद्रामध्ये अनेक ठिकाणी आपला हक्क सांगत आहे आणि दुसरीकडे लष्करी सामर्थ्य दाखवत आहे. यातच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, यात पीपल्स लिबरेशन आर्मीची (PLA) पोलखोल झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये चिनी लष्कराचा अॅंफिबियस रणगाडा पाण्यात बुडताना दिसत आहे. असे म्हटले जात होते की, हा रणगाडा पाण्यात आणि जमिनीत अतिशय सक्षम आहे. मात्र या व्हिडीओमुळे चीनच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या amphibious टॅंकचे काम पाण्याच्या आत राहून प्रतीक्षा करणे आणि अचानक हल्ला करणे किंवा एखाद्या संशयास्पद वाहनास आवश्यक असल्यास नदी ओलांडण्यापासून थांबविणे असते. आता असा आरोप केला जात आहे की, ही टॅंक तयार करण्यासाठी निकृष्ठ दर्जाचे स्टील वापरण्यात आले आहे, त्यामुळे ते पाण्यात बुडाले. वाचा- …आणि डोक्यावर कोसळली बाल्कनी, पाहा भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO
वाचा- शार्कच्या जबडयात होता पत्नीचा पाय, नवऱ्यानं पाण्यात मारली उडी आणि…; पाहा VIDEO का आहे SCSवर चीनची नजर? दक्षिण चीन समुद्रात ज्या क्षेत्रावर चीनची नजर आहे, खनिज व उर्जा मालमत्तांचा भांडार आहे. इतर देशांशी चीनचे संघर्ष कधीकधी तेल, कधीकधी गॅस किंवा माशांनी भरलेल्या क्षेत्राच्या आसपास देखील होतात. चीन ‘U’ आकाराच्या ‘नाईन डॅश लाइन’ च्या आधारे या प्रदेशात आपला हक्क सांगत आहे. त्यामध्ये व्हिएतनामचा एक्स्क्लूसिव्ह इकॉनॉमिक झोन (EEZ), पॅरासल आयलँड, स्प्राटली आयलँड, ब्रून, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपीन आणि तैवानच्या EEZचा समावेश आहे.