नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : अगदी छोट्या कारणांवरून टोकाचं पाऊल उचललं जातं अनेकदा छोट्या गोष्टींमध्ये निराशा झाली की आपल्याला वाईट वाटतं आणि खचून जातो. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून एकच ओळ आपल्या पटकन ओठावर येते हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती...
खरंच जो प्रयत्न करतो त्याला यश नक्की मिळतं आणि हेच सांगणारा एक प्रेरणात्मक व्हिडीओ आहे. 8 वर्षांच्या दिव्यांग मुलीनं हिम्मत न हारता जिमनॅस्टीक केले आहेत. मेहनत आणि सकारात्मकता ठेवून हिम्मत न हारता या मुलीनं केलेल्या कष्टाचं हे चीज आहे. तिचं जिमनॅस्टीक पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
अमेरिकेतील ओहायो इथल्या 8 वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. ही मुलगी जिमनॅस्टीकमध्ये पुढे करिअर करण्याबाबत सांगते. या मुलाच्या जन्मापासून तिला दोन्ही पाय नाहीत. केवळ दृढ संकल्प आणि इच्छा शक्तीच्या जोरावर तिने हे यश मिळवल्याचं कॅलेंडिन सांगते. या मुलीचं नाव कॅलेंडिन असं आहे.
जे कॅलेंडिनने वयाच्या 18 व्या महिन्यापासूनच खेळामध्ये भाग घेणे सुरू केले. पण आता, अथक परिश्रम आणि दृढ निश्चय शक्तीच्या जोरावर, आपल्या दिव्यंगला आपल्या यशाच्या मार्गात अडथळा आणता येणार नाही, असा विश्वास त्यांना सापडला आहे.