Home /News /viral /

बादशाहच्या 'गेंदा फूल' गाण्यावर या मुलीचा VIDEO व्हायरल, जॅकलिनलाही टक्कर देईल अशा अदा

बादशाहच्या 'गेंदा फूल' गाण्यावर या मुलीचा VIDEO व्हायरल, जॅकलिनलाही टक्कर देईल अशा अदा

एखाद्या प्रसिद्ध गाण्यावर कधी कधी सोशल मीडिया स्टारने बनवलेले गाण मुळ गाण्यापेक्षा जास्त हिट ठरतं. बादशाहाच्या "गेंदा फूल" गाण्याबाबतही तसच काहीसं झालं आहे

    मुंबई, 13 एप्रिल : एखाद्या प्रसिद्ध गाण्यावर कधी कधी सोशल मीडिया स्टारने बनवलेले गाण मुळ गाण्यापेक्षा जास्त हिट ठरतं. बादशाहाच्या "गेंदा फूल" गाण्याबाबतही तसच काहीसं झालं आहे. 'डीजेवाले बाबू', 'मर्सी', 'बझ' या गाण्यांसाठी प्रसिद्ध असणारा रॅपर बादशाहचे गेंदा फूल हे गाणं सोशल मीडियावर काही काळातच हिट ठरलं आहे. सध्या सर्वजण लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. अशावेळी सोशल मीडिया हे एकमेव साधन आहे, ज्यामुळे लोकांचं मनोरंजन होत आहे. अशा परिस्थितीत बादशाहचं हे गाणं खूप लाइक्स आणि कमेंट्स मिळवत आहे. 'गेंदा फूल' (Badshah new song Genda Phool) या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये हा जॅकलिन फर्नांडिस बादशाहसोबत थिरकताना दिसली आहे. ज्यामध्ये नेहमीप्रमाणेच जॅकलिन तिच्या हॉट अंदाजामध्ये दिसली आहे. (हे वाचा-Coronavirus : इथं चाललंय काय आणि यांना चिंता वेगळीच, म्हणे किसिंग सीनचं कसं? या गाण्यामध्ये फेस्टिव्ह आणि पारंपरिक अंदाज आहे. स्नेहा शेट्टीने (Sneha Shetty) दिग्दर्शित केलेला हा म्युझिक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यामध्ये बंगाली दुर्गा पुजेचा समारोह वेगळ्या अंदाजात साकारण्यात आला आहेे. यामध्ये जॅकलिन लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडी नेसून पारंपरिक बंगाली अंदाजात दिसत आहे. त्याचप्रमाणे ती हॉट अंदाजात देखील दिसत आहे. यातील बेंगाली ओळी गायिका पायल देवने गायल्या आहेत. हे गाणं आतापर्यंत 16 मिलियन वेळा पाहिलं गेलं आहे. मात्र सध्या या गाण्यावर थिरकताना एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे वाचा-रामायणातील या कलाकाराला आज सर्व शोधत आहेत, काम न मिळाल्यामुळे सोडली होती मुंबई) MONAMI GHOSH नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका सुंदर साडीमध्ये ही मुलगी गेंदा फूल गाण्यावर डान्स करते आहे. या मुलीची तुलना जॅकलिनबरोबर तिचे फॅन्स करत आहेत. मोनामीने हा व्हिडीओ 31 मार्चला युट्यूबवर पोस्ट केला होता. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक वेळा तिचा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. याआधीही मोनामीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या