Coronavirus : इथं चाललंय काय आणि यांना चिंता वेगळीच, म्हणे किसिंग सीनचं कसं?

Coronavirus : इथं चाललंय काय आणि यांना चिंता वेगळीच, म्हणे किसिंग सीनचं कसं?

लॉकडाऊननंतर शूटिंग सुरू केल्यावर किंसिंग सीन कसा घ्यायचा असा प्रश्न बॉलिवूड डायरेक्टरनं विचारल्यानंतर त्यावर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : सध्या देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. या व्हायरसचं वाढतं संक्रमण पाहता देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जातच आहेत. पण यासोबतच सर्वांनी घरी राहून स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. यामुळे नेहमीच बीझी राहणारे बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या मात्र पूर्णपणे फ्री असल्याचं पाहयला मिळत आहे. पण अशाच प्रसिद्ध दिग्दर्शक शूजित सरकार यांची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असा अजब प्रश्न विचारला आहे की सर्वजण हैराण झाले आहेत.

शूजित सरकार यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्या पोस्टमध्ये त्यांनी लॉकडाऊननंतर शूटिंग सुरू केल्यावर किंसिंग सीन कसा घ्यायचा याविषयी चिंता व्यक्त केली आहे. हे लॉकडाऊन संपल्यावर अखेर किंसिंग किंवा इंटीमेट सीन्स कसे शूट केले जाणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच जर हे शूट सीन झाले नाहीत तर यामुळे स्टोरी टेलिंगमध्ये फिल्म मेकर्स चिटिंग करणार का? असंही त्यांनी विचारलं आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, हे सर्व जेव्हा संपेल तेव्हा फिल्म इंड्स्ट्रीमध्ये अशा वातावरणात इंटीमेट सीन्स कसे शूट केले जाणार आहेत. खास करुन किंसिंग किंवा एकमेकांना मिठी मारण्याचे सीन केवढ्या अंतरावरून शूट केले जाणार आहेत. किंवा मग काही काळासाठी स्टोरी टेलिंगमध्ये इंटीमेट सीन्सबाबत चिटिंग केली जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

“Intimate scenes “

A post shared by Shoojit Sircar (@shoojitsircar) on

त्यांच्या या पोस्टवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. अभिनेत्री दिया मिर्झानंही यावर कमेंट केली आहे. तिनं लिहिलं, 'गुरू फिल्म मेकिंगची पूर्ण प्रक्रियाच इंटिमेट आहे. त्यामुळे अनेक लोक एकामागोमाग एक काही काळ एकत्र वेळ घालवण्यासाठी आणि प्रयत्न करण्यासाठी एकत्र येतीलच पण आम्ही मास्क आणि ग्लव्स घालून यावं की अजून काही हे मात्र फक्त येणारा काळच ठरवेल.'

हे वाचा : लॉकडाऊनमुळे उत्तराखंडमध्ये अडकले मनोज वाजपेयी, दीपक डोबरियाल; अशी आहे परिस्थिती

सध्या कोरोना व्हायरसमुळे अनेक कलाकार घरी राहून स्वतःची काळजी घेत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. आपल्या चाहत्यांना घरी राहण्याचं आवाहन करत आहेत. तसेच त्यांच्या लॉकडाऊन काळाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. सध्या तरी सर्व सिनेमांचं शूटिंग थांबलं आहे. अनेक सिनेमांच्या रिलीज डेट टळून गेल्या आहेत. त्यामुळे आता हे सिनेमा कधी रिलीज होणार याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

सलमान खानवरुन गर्लफ्रेंडवर संशय घ्यायचा हा कोरिओग्राफर, ब्रेकअपनंतर झाली पोलखोल

First published: April 12, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading