मराठी बातम्या /बातम्या /Viral /खरंच हा 'कंबल वाले बाबा'चा चमत्कार? रुग्णावर घोंगडी टाकून आजारातून मुक्त केल्याचा दावा

खरंच हा 'कंबल वाले बाबा'चा चमत्कार? रुग्णावर घोंगडी टाकून आजारातून मुक्त केल्याचा दावा

कंबलवाले बाबा चर्चेत.

कंबलवाले बाबा चर्चेत.

ज्यावर उपचारच नाहीत असे जगातील प्रत्येक गंभीर आजार घोंगडीने उपचार करून बरे करत असल्याचा दावा करत कंबलवाले बाबांनी वैद्यकीय क्षेत्रालाच आव्हान दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Rajasthan, India

अलकेश सनाढ्य/अजमेर, 27 जानेवारी : मध्य प्रदेशमधील बागेश्वार धाममधील पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यानंतर आता राजस्थानच्या राजसमंदमधील कंबलवाले बाबा चर्चेत आले आहेत. जे फक्त घोंगडीने चमत्कार करत असल्याचं सांगितलं जातं आहे. लकवा आणि इतर कधीच बरे न होणारे आजार काळ्या घोंगडीनेच ते बरे करत असल्याचा दावा केला जातो आहे. त्यांच्या या दाव्यावर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

कंबलवाले बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बाबाचं खरं नाव गणेश भाई गुर्जर असं आहे. ते मूळचे गुजरातचे. त्यांच्या खांद्यावर नेहमी एक काळी घोंगडी आणि डोक्यावर काळी पगडी असते. आपल्या घोंगडीनेच आपण रुग्णांना बरं करत असल्याचा दावा या बाबाने केला आहे.

या बाबाने सांगितलं की, "माझ्या घोंगडीत अध्यात्मिक शक्ती आहे.  ही घोंगडी मला आंब्याच्या झाडावर मिळाली. ही घोंगडी कुणावरही टाकली तर तो बरा होईल, अशा आशीर्वाद मला देवीने दिला आहे. देवीच्या आशीर्वादाने मला ही सिद्धी प्राप्त झाली. कोणत्याही व्यक्तीवर हे पांघरूण टाकल्यानंतर त्याची  नाडी आणि शरीर पाहिल्यानंतर त्याच्या आजाराची माहिती होते. आज मला 32 वर्षे झाली मी सकाळ ते संध्याकाळपर्यंत हेच काम करतो"

हे वाचा - चर्चा तर होणारच! कपलने केलं असं लग्न की शाही विवाह, डेस्टिनेशन वेडिंगही फेल; पाहा WEDDING PHOTO

वेगवेगळ्या ठिकाणी 15-15 दिवसंचं शिबीर लावून लोकांवर ते उपचार करतात. त्यांच्या शिबिरात फक्त राजस्थान नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा कित्येक राज्यांतून लोक येतात. शिबिरात जास्तीत जास्त लकवाग्रस्त लोक उपचारासाठी येतात.

शिबिरात येण्यासाठी लोक 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करतात. तर शिबिर स्थळी एक रुपयाचाही खर्च होत नसल्याचाही दावा केला जातो आहे. पण तरी या ना त्या मार्गाने बाबाची बम्पर कमाई होते आहे.

अशी होते कंबलवाले बाबाची बम्पर कमाई

40 रुपयांचं जेवणाचं ताट विकून ते जवळपास 2 लाख रुपये कमवतात.

बिसलेरी पाण्याची बाटली 15 ते 20 रुपयांपर्यंत विकून 30 ते 40 हजार रुपयांची कमाई करतात.

याशिवाय चहा, यंत्र विकून खूप कमाई होते.

लोकांना हवन करण्यासाठी 11 नारळांची गरज पडते. इथं नारळही मिळतात. एका नारळाची किंमत 20 रुपये असते. जवळपास 7 ते 8 गोणी नारळ खपतात.

शिबिर व्यवस्थापनात बाबाचा एक रुपयाही खर्च होत नाही, कारण तिथं काम करणारे त्यांचे भक्त असतात.

हे वाचा - गॅस...लॉक...खत्म...! पोटातील गॅसवरील विचित्र उपचाराचा हा VIDEO पाहूनच चक्रावाल

दरम्यान घोंगडीने आपण आजार बरा करत असल्याचा दावा करणाऱ्या या बाबाकडे जे लोक आले त्यापैकी काहींनी बाबाच्या घोंगडीला स्पर्श केल्याने, बाबांनी हात लावल्यानंतर आपण बरे झाल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी आपल्याला काहीच आराम न मिळाल्याचंही सांगितलं आहे.

ज्यावर उपचारच नाहीत अशा जगातील प्रत्येक गंभीर आजारांवर लगेच उपचार करून बरे करत असल्याचा दावा करत कंबलवाले बाबांनी वैद्यकीय क्षेत्रालाच आव्हान दिलं आहे. न्यूज 18 लोकमत बाबा करत असलेल्या दाव्याचं समर्थन करत नाही पण तुम्हाला यात कितपत तथ्य वाटतं ते आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Rajasthan, Viral