कोर्ट मॅरेजपासून डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत तुम्ही बरीच लग्न पाहिली असतील. पण सध्या अशा लग्नाची चर्चा होते आहे, जसं तुम्ही याआधी कधीच पाहिलं नसेल.
मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधील दाम्पत्याने अशा पद्धतीने लग्न केलं आहे, की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
शंखनाद आणि वेद, मंत्रोच्चाराने विवाहाचा शुभारंभ झाला. वरमाला घालतानाही शंख वाजवण्यात आला, मंत्रोच्चार करण्यात आले.
या लग्नात आणखी एक खास होतं ते म्हणजे गोमातेचं पूजन. वधू-वराने गाईला आपल्या हाताने खाऊ घातलं. गोमातेचं पूजन करून हा विवाह संपन्न झाला.
एकंदर या लग्नात भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. इतर लग्नांपेक्षा खरंच सुंदर असा हा विवाहसोहळा आहे.