मुंबई, 17 ऑक्टोबर : पोटातील गॅसची समस्या अनेकांना असते. हा गॅस दूर करण्यासाठी लोक काय काय उपाय करतात. कुणी जेवणानंतर सोडा पितं, कुणी चूर्ण खातं. असे वेगवेगळे घरगुती उपाय करूनही गॅसच्या समस्येतून मुक्ती मिळाली नाही की आपण डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर एखादं औषध देतात. पण सध्या सोशल मीडियावर पोटातील गॅसवरील विचित्र उपचाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन व्यक्ती समोरासमोर दिसत आहेत. यातील एक डॉक्टर आणि एक रुग्ण असल्याचं सांगितलं जातं आहे. डॉक्टर रुग्णाच्या पोटावर सुरुवातीला लाकडी पट्टीने मारताना दिसतो. तेव्हा तो गॅस लॉक असं ओरडताना दिसतो. त्यानंतर तो रुग्णाच्या पोटावरून हात फिरवतो, त्याच्या पोटावर हात ठेवून दाबतो आणि रुग्णाला पोटात वाकवतो. तेव्हा मध्येच गॅस लॉक आणि गॅस खत्म असं म्हणतो. हे वाचा - Stomach Gas : गॅसच्या समस्येने त्रस्त आहात? पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी करा हे घरगुती उपाय असं काही वेळ केल्यानंतर तो दोन मिनिटांत तुमच्या पोटातील गॅस कायमचा जाईल, असं व्हिडीओच्या शेवटी सांगतानाही दिसतो. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, हा डॉक्टर कोण आहे, त्याचं नाव आहे, याबाबत अद्याप काहीच माहिती नाही.
@iKnightRider19 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पण असे विचित्र उपचार करणारे किंवा लोकांना फसवणारे बोगस डॉक्टरही कमी नाहीत.
@RetardedHurt as Doctor !! pic.twitter.com/U4CQgXU3T0
— Knight Rider (@iKnightRider19) October 16, 2022
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत अधिक काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा. पोटात गॅस होण्याची कारणे - पोटात गॅस होण्याचं प्रमुख कारण म्हणजे शरीरास न पचणारं आणि पोटासाठी जड असणारं अन्न ग्रहण करणं. जेव्हाही असं जड आणि न पचणारं अन्न खाल्लं जातं, तेव्हा त्याचं पचन लवकर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला गॅसेसची समस्या उद्भवू शकते. त्याचबरोबर जेवणादरम्यान वारंवार पाणी प्यायल्यामुळेदेखील अन्नपचन होत नाही आणि पोटात गॅस तयार होतात. त्यामुळे जेवताना आणि जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावं. यामुळे अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे होतं. - आपल्या आहारातले अनेक पदार्थ गॅस तयार करण्यास कारणीभूत असतात. तुम्हाला पोटात गॅस होण्याची समस्या नेहमी सतावत असेल, तर तुम्ही तुमचा आहार बदलून पाहावा. कोबी, ब्रोकोली, राजमा, भिजवलेले हरभरे, शेंगदाणे, बटाटे, नूडल्स यांसारख्या पदार्थांमुळे पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी अशा पदार्थांचे सेवन करणं टाळावं. हे वाचा - महिलांच्या फक्त पोटातच नव्हे तर Vagina मध्येही होतो गॅस; काय आहेत कारणे आणि उपाय पाहा - काही जणांना जेवल्यानंतर लगेच बसून राहण्याची किंवा झोपण्याची सवय असते. ही सवय तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. या सवयीमुळे नुकसान होतं. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, जेवण झाल्यानंतर बसून राहिल्यामुळे अन्न लवकर पचत नाही. त्यामुळे जेवण झाल्यानंतर किमान दहा मिनिटं चालावं. यामुळे अन्नपचन होण्यास मदत होते आणि पोटात गॅस होण्याच्या समस्येला आळा बसतो.