मुंबई, 27 नोव्हेंबर : आपण दररोज आपल्या आजूबाजूला बरेच आवाज ऐकतो. दिवसभराचा गजबजाट रात्री मात्र शांत होतो आणि रात्रीच्या शांततेत कुत्र्यांच्या भुंकणं, रातकिडे यांचा आवाज ऐकू येतो. पण काही जणांना या वेळेत विचित्र आवाजही ऐकू आल्याची प्रकरणं आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एक पोलीस अशा विचित्र आवाजाला घाबरला आहे.
लहानपणीच आपल्याला कुत्रा, मांजर, चिऊ, काऊ कशी ओरडते हे विचारलं जातं. त्यावेळी त्या ऐकलेल्या आवाजाची आपण नक्कल करून दाखवतो. डोळ्यावर पट्टी बांधली आणि एखादा आवाज ऐकवला तरी तो आवाज कुणाचा किंवा कसा हे आपण सांगू शकतो. पण काही आवाज आपण ऐकलेले नसतात, त्यातही ते भयानक असतात. फक्त आवाज ऐकूनच आपण गार होऊ असे हे आवाज. जो या व्हिडीओत तुम्हाला ऐकू येईल. अगदी पोलीसही घाबरला यावरूनच हा आवाज किती भयानक असेल याचा अंदाजा तुम्हाला आला असेल. इतकं या आवाजात आहे तरी काय हे ऐकण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल.
हे वाचा - Shocking Video! जेवणाच्या ताटात अचानक जिवंत झाला मासा; व्यक्ती खाणार तोच त्याने तोंड उघडलं आणि...
व्हिडीओ तुम्ही पाहाल तर रात्रीची वेळ आहे. समोर काळाकुट्ट अंधार आहे. कसला तरी आवाज येतो म्हणून पोलीस थोडं पुढे जाऊन टॉर्चचा लाइट मारून इथं तिथं पाहतो आहे. इतक्यात त्या अंधारातून आवाज येतो. आवाज ऐकूनच धडकी भरते. आवाजाने तुमच्याप्रमाणे पोलीसही दचकल्याचा दिसतो. साहजिकच पोलीसही माणूस आहे. असा खतरनाक आवाज ऐकून तर कुणीही घाबरेल. पोलिसाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नाही. तसाच टॉर्च पँटमध्ये टाकतो आणि तो मागे वळतो.
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण या व्हिडीओतील आवाज नेमका कुणाचा तुम्ही ओळखला का? तुम्ही सांगू शकाल का? तुम्हालाही हा भुताचा आवाज वाटतो आहे का?
हे वाचा - रात्री गाढ झोपलेल्या व्यक्तीसमोर अचानक आलं 'भूत', पुढे काय घडलं? पाहा Viral Video
@OTerrifying ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा भय़ानक आवाज माऊंटन लायनचा आहे.
Cop gets scared by a mountain lion’s scream 😳 pic.twitter.com/B1znVLUCWc
— OddIy Terrifying (@OTerrifying) November 27, 2022
कदाचित तुमच्याप्रमाणे या पोलिसालाही हा आवाज भुताचा वाटला असावा किंवा त्याने माऊंट लायनचा आवाज ओळखला असावा किंवा त्याला पाहिलं असावं. म्हणूनच तो घाबरून गप्पपणे तिथून पळाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Police, Viral, Viral videos, Wild animal