बीजिंग, 26 नोव्हेंबर : आमची मुलं सतत टीव्ही पाहत असतात, अशी तक्रार अनेक पालकांची असते. काही केल्या त्यांना टीव्हीपासून दूर करता येत नाही. अशाच आपल्या मुलाच्या सतत टीव्ही पाहण्याच्या सवयीला वैतागलेल्या पालकांनी त्याला अशी शिक्षा दिली. की पाहून नेटिझन्सनही हादरले आहेत. टीव्ही पाहतो म्हणून अशी नको ती शिक्षा देणाऱ्या पालकांविरोधात नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल.
आता तुमची मुलं जर खूप टीव्ही पाहत असतील तर तुम्ही त्यांना काय शिक्षा देता... ओरडता, मारता, जास्त टीव्ही पाहिल्याने त्यांच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतील हे समजावता, ज्या गोष्टीला किंवा व्यक्तीला ते घाबरत असतील त्याची भीती दाखवता. फार फार तर त्याला त्याची आवडीची वस्तू देणार नाही किंवा जेवायला देणार नाही, असं सांगता. पण तुम्ही कधी विचारही केला नसेल, अशी शिक्षा या व्हिडीओतील पालकांनी त्यांच्या मुलाला दिली आहे.
हे वाचा - बापाचं पोटच्या लेकासोबत भयानक कृत्य; VIDEO पाहून नेटिझन्स भडकले, व्यक्त केला संताप
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. माहितीनुसार हुनांन प्रांतातील हे दाम्पत्य बाहेर जात होतं, तेव्हा त्यांनी आपल्या 8 वर्षांच्या मुलाला आपला होमवर्क पूर्ण करायला सांगितलं आणि साडेआठ वाजता झोपायला सांगितलं. पण तो टीव्ही पाहत राहिला. जेव्हा ते घरातून निघाले तेव्हा तो टीव्ही पाहत होता आणि जेव्हा ते बाहेरून घरी परतले तेव्हाही तो टीव्ही पाहत होता. त्याने आपला होमवर्कही पूर्ण केला नव्हता. त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी त्याला शिक्षा देण्याचं ठरवलं.
आता अशावेळी तुम्ही काय केलं असतं तर टीव्ही बंद ठेवला असता. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल या पालकांनी मुलाला टीव्ही पाहायला मनाई केली नाही तर उलट आणखी टीव्ही पाहायला लावला. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं आहे.
हे वाचा - अजबच आहे राव! टूथपेस्ट चोरून चोर दुसऱ्या राज्यात फरार; पोलिसांनी तिथं जाऊन ठोकल्या बेड्या
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता मुलगा सोफ्यावर बसला आहे. मध्येच उठून तो आपल्या खोलीत जातो पण त्याचे पालक पुन्हा त्याला सोफ्यावर आणून बसवतात. तो टीव्ही पाहून कंटाळला असतो, त्याला झोपही येत असते. पण रात्र झाली तरी ते त्याला झोपायला देत नाही. त्याला उठवून टीव्ही पाहायला सांगता. शेवटी काही तास त्या मुलाला झोपायला दिलं जातं.
ही अशी शिक्षा पाहून नेटिझन्सनी टीका केली आहे. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Parents, Parents and child, Viral, Viral videos