मुंबई २१ नोव्हेंबर : असं म्हणतात की भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे आहे. हे चौथ्या नंबरवर येते, तर या पूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन हे पहिल्या तीन क्रमांकावर येतात. तुम्ही भारतीये रेल्वेने एकदा तरी प्रवास केलाच असणार. हा प्रवास कमी खर्चीक आणि सर्वच श्रेणीतील लोकांना परवडणारा असतो. तसेच ते आपल्याला वेळेवर पोहोचवते.
रेल्वेने दररोज जवळपास करोडो लोक प्रवास करतात. लांब प्रवासी गाडीच नाही तर अगदी लोकलने देखील दररोज लाखो लोक प्रवास करतात. तेव्हा तुम्ही रेल्वेशी संबंधीत अनेक गोष्टी पाहिल्या असतील. पण त्या का असतात किंवा त्यांचं काम काय? असा विचार आपण जास्त करत नाही.
हे ही वाचा : वकील काळ्या आणि सफेद रंगाचे कपडे का घालतात? फार कमी लोकांना माहित असेल यामागचं कारण
त्यांपैकी एक म्हणजे रेल्वे रुळाच्या बाजूला असलेले मेटल बॉक्स. यांना आपण नेहमी पाहातो. पण हे बॉक्स नेकमं काय काम करतात? याबद्दल आपण फारसा विचार करत नाही किंवा तो इलेक्ट्रीकल बॉक्स असावा जो, ट्रेनशी संबंधीत गोष्टी कन्ट्रोल करत असावा, पण तसे नाही. याचा वापर काही वेगळाच आहे.
हे बॉक्स सहसा ऍल्युमिनियमचे बनलेले असतात. आता त्यांचा उपयोग काय आणि ते का ठेवला जातो हे आज जाणून घेऊया.
या सर्व बॉक्सेसचं महत्वाचं कार्य हे प्रवाशांच्या सुरक्षेशी निगडीत आहे. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर त्यात सेन्सर बसवलेले आहेत आणि ट्रेनच्या बोगीची मोजणी तो बॉक्स करतो आणि ते त्याचे मुख्य काम आहे.
या बॉक्सला काय म्हणतात?
याला 'एक्सल काउंटर बॉक्स' म्हणतात (Axle Counter Box) आणि हे बॉक्स तीन ते पाच किमीवर बसवले जातात. हे बॉक्स ट्रेनचे एक्सल मोजतात. हे एक्सल ट्रेनच्या बोगीच्या दोन चाकांना जोडलेला असतो आणि त्याला हे उपकरण मोजतो. हे उपकरण फक्त त्या अक्षांची मोजणी करते.
हा 'एक्सल काउंटर बॉक्स' ट्रेन गेल्यावर सांगते की त्यात चाकांची संख्या कमी आहे. यामुळे तुम्हाला संभाव्य अपघाताची माहिती मिळते.
रिपोर्ट्सनुसार, हा एक्सल काउंटर बॉक्स कोचमध्ये बसवलेल्या एक्सलची मोजणी करतो आणि पुढील बॉक्समध्ये पाठवतो आणि नंतर तोच क्रम राहतो. अक्षांची संख्या कमी असल्यास किंवा पुढील मोजणीमध्ये फरक असल्यास, हा बॉक्स लाल सिग्नल देतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या अपघातांपासून ट्रेन वाचते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Social media, Top trending, Train, Viral