मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वकील काळ्या आणि सफेद रंगाचे कपडे का घालतात? फार कमी लोकांना माहित असेल यामागचं कारण

वकील काळ्या आणि सफेद रंगाचे कपडे का घालतात? फार कमी लोकांना माहित असेल यामागचं कारण

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये वकिलांसाठी या रंगाचा ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई २० नोव्हेंबर : तुम्ही अनेकदा टीव्हीमध्ये किंवा खऱ्या आयुष्यात वकिलांना पाहिलं असेल, ते नेहमीच तुम्हाला पांढरा शर्ट आणि काळ्या कोटमध्ये दिसतील. पण त्यांना पाहून कधी तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की काळे आणि पांढरे कपडेच का घातले जातात? या मागे काही कारण आहे का?

खरंतर फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये वकिलांसाठी या रंगाचा ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे.

हे ही वाचा : पिल्लांना वाचवण्यासाठी सापाशी भिडली कोंबडी आणि मग... धोकादायक Video Viral

जगात वकिली सुरू झाली, त्या काळात न्यायाधीशांसाठी खास ड्रेस कोड तयार करण्यात आला. त्यावेळी न्यायाधीश केसांचा विग घालत असत. यासह, विद्यार्थी, वकील, खंडपीठ आणि बॅरिस्टर वकील या चार श्रेणींमध्ये विभागले गेले.

वकिलांची ओळख न्यायाधीशांपासून वेगळी करण्यासाठी 1637 मध्ये वकिलांचा ड्रेस कोड देण्यात आला. हा तो काळ होता जेव्हा वकील लांब गाऊन घालू लागले. या कपड्यांमुळे सामान्य माणूस, न्यायाधीश आणि वकील यांच्यात फरक जाणवू लागला.

या काळ्या कोटशी संबंधित आणखी एक कथा खूप प्रसिद्ध आहे की 1694 मध्ये ब्रिटनची राणी मेरीच्या मृत्यूनंतर महाराजांनी सर्व न्यायाधीश आणि वकिलांना काळ्या गाऊनमध्ये शोक व्यक्त करण्याचा आदेश दिला, त्यानंतर सर्व न्यायाधीश आणि वकिलांनी काळा गाऊन वापरण्यास सुरुवात केली. कारण त्या दिवसानंचर महाराजांचा हा आदेश रद्द केलाच नाही. त्यामुळे वकिलांनी काळे कपडे घालणं सुरुच ठेवलं.

बदलत्या काळानुसार काळा कोट हा वकिलांच्या कामाचा एक भाग बनला. पुढे 1961 च्या कायद्याद्वारे वकिलांसाठी पांढरा बँड टाय आणि काळा कोट कायदेशीर करण्यात आला, म्हणजेच वकिलांसाठी हा पोशाख अनिवार्य करण्यात आला.

म्हणूनच आज जेव्हा जेव्हा आपण कोर्टात जातो तेव्हा काळा कोट आणि पांढर्‍या रंगाची टाय घालून वकील काम करताना दिसतात. या ड्रेसमुळे वकिलांमध्ये वेगळाच विश्वास निर्माण होतो, असं देखील काही वकिलांचं मत आहे.

First published:

Tags: Marathi news, Social media and relationships, Top trending, Viral