मुंबई 30 जानेवारी : राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' सोमवारी 30 जानेवारीला श्रीनगर येथे समाप्त झाली आहे. काँग्रेसने या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर मेगा रॅलीचे आयोजन केले आहे. काँग्रेस नेतृत्वाशिवाय या रॅलीमध्ये विरोधी पक्षांचे अनेक नेते सामील झाले आहेत. ज्यामुळे अनेकांच्या नजरा येथे वळल्या.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीदरम्यान समारोप समारंभात सांगितले की, ते वर्षानुवर्षे दररोज 8-10 किलोमीटर धावायचे, त्यामुळे हा प्रवास सोपा होईल असे त्यांना वाटत होते. पण हा प्रवास वाटला तितका सोपा नव्हता.
हे ही पाहा : जगातील असा एकमात्र देश ज्याची सीमा 14 देशांशी जोडलीय, तुम्हाला माहितीय त्याचं नाव?
राहुल गांधी यांनी 29 जानेवारीला श्रीनगरच्या लाल चौकात सुमारे 4 हजार किलोमीटर चालल्यानंतर राष्ट्रध्वज फडवला, यानंतर त्यांची ही यात्रा संपली, ज्यानंतर 30 जानेवारीला त्यांनी या कार्यक्रमाचा सांगता केला. त्यांची ही यात्रा 135 दिवसांनी संपली आहे.
राहुल गांधी यांनी आपले वडील राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करुन भारत जोडो यात्रेची सुरुवात 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथुन केली. कन्याकुारी ते कश्मिर असा चालत त्यांनी 4 हजार किलोमीटरचा प्रवास केला. तरुणांना चालण्यासाठी तसेच आरोग्यासाठी प्रेरीत करणं आणि जागृकता निर्माण करणं हा त्यामागचा राहुल गांधी यांचा एक होतू होता
त्यांच्या या यात्रेला युवकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सोबतच मोठ सेलिब्रिटी देखील या यात्रेत सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांच्या या यात्रेला विदेशातून देखील सपोर्ट मिळाला आहे. तर काही लोकांकडून या रॅलीला विरोध देखील होत आहे.
या सगळ्या पॉलिटीकल गोष्टींकडे लक्ष न देता. यामधील खऱ्या मुद्याकडे आपण वळूयात की, राहूल गांधी आतापर्यंत जवळजवळ 4 हजार किलोमीटर चालले आहे. त्यांचे रॅलीमधील अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते धावताना, उड्या मारताना, डान्स करताना आणि स्वत:ला चाबूक मारताना देखील दिसले.
पण विचार करा की जर एवढं एखादी व्यक्ती चालली तर शरीरावर त्याचा काय परिणाम होतो? किंवा तुम्ही यामुळे बारीक होऊ शकता का?
सध्याच्या बिझी शेड्यूलमध्ये लोकांना आपल्या शरीराला द्यायला वेळ मिळत नाही, ज्यामुळे लठ्ठपणाच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते.
त्यामुळे चालणे हे शरीरासाठी खरंच खूपच चांगला पर्याय असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.
तज्ज्ञांचं मते आठवड्यातून 5 दिवस 10 किमी चालण्याने दर आठवड्याला 2 हजार 100 ते 3 हजार 600 कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयी तशीच ठेवली, तर तुम्ही दर आठवड्याला ⅔ पौंड (०.३ किलो) ते १ पौंड (०.४५ किलो) चरबी कमी होण्याची अपेक्षा करू शकता.
चालण्याचे फायदे काय?
चालण्यामुळे खरंतर रक्तप्रवाहाला चालना मिळते, तसेच वेगाने चालणे तुमच्या हृदयाचे आणि फुफ्फुसांचे आरोग्य देखील सुधारू शकते. चालण्यामुळे अनेक आरोग्य विषयी समस्यांचा धोका कमी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे वजन नियंत्रीत करण्यात मदत होते.
याव्यतिरिक्त, वेगाने चालणे तुमच्या मेंदूचे कार्य सुधारू शकते, तुमची ऊर्जा वाढवू शकते, तणाव कमी करू शकते आणि तुमची झोप सुधारू शकते.
आता सर्वसान्यांचा प्रश्न हा असतो की चालण्याने पोट कमी होतं का?
चालणे हा व्यायामाचा सर्वात कठीण प्रकार तर नाही, परंतु शरीराला शेप येण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग नक्कीच आहे. चालण्याने एकूणच चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे परिणामी हळूहळू पोटाची चर्बी देखील कमी होते. पण सोबतच व्यायाम केलं तर तुम्हाला पोट कमी करण्यासाठी मदत नक्की होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bharat Jodo Yatra, Lifestyle, Rahul gandhi, Social media and relationships, Viral, Walk