नवी दिल्ली, 25 जून : आतापर्यंत अजगराला इतर प्राण्यांची शिकार करताना आणि किंग कोब्राला माणूस किंवा इतर प्राण्यांवर हल्ला करताना पाहिलं असेल. पण कधी अजगर आणि किंग कोब्रा यांना आपसात लढताना तुम्ही पाहिलं आहे का? अशीच अजगर आणि किंग कोब्राची फाईटिंग सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या फायटिंगचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अजगर आणि किंग कोब्राबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. दोन्ही जगातील सर्वात धोकादायक सापां पैकी एक आहेत. कोब्रामध्ये इतके विष असते की त्याने एखाद्याला दंश केला तर तो काही क्षणात मरू शकतो. त्याचवेळी अजगराबद्दल असे म्हटले जाते की, जर एखादा बळी त्याच्या तावडीत पडला तर मृत्यू निश्चित आहे. कारण तो अशाप्रकारे जखडतो की की संपूर्ण शरीर तुटते. कधीकधी तो फक्त आपला शिकार गिळतो. असे दोन्ही खतरनाक साप एकमेकांसमोर आले तर… @natureismetales ट्विटर अकाऊंटवर हा फोटो ट्विट करण्यात आला आहे. ज्यात अजगर आणि साप एकमेकांच्या विळख्यात दिसत आहेत. हा फोटो कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. रस्त्यावर भांडता भांडता हातात घेतला जिवंत साप; पुढे जे घडलं ते धक्कादायक; VIDEO VIRAL ट्विटच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार कोब्राने अजगराचा चावा घेतला. अजगरानेही कोब्राला आपल्या विळख्यात घेतलं. कोब्राच्या विषामुळे अजगराचा आणि अजगराच्या विळख्यात कोब्राचा जीव गेला. दोन खतरनाक सापांच्या लढाईत दोघांचाही मृत्यू झाला. या पोस्टवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी तो कोब्रा नाही तर अॅनाकोंडा असू शकतो, कोब्रा इतके लांब नसतात असं म्हटलं आहे. पण अनेक लोक याला एशियन कोब्रा म्हणतात. एकान मी अशा स्थितीचा विचारही करू शकत नाही, या ठिकाणापासून दूर राहायचं आहे, असं म्हटलं आहे. Shocking! खेळणं म्हणून अवाढव्य अजगरासोबत खेळत राहिला चिमुकला, शेवटी…; थरकाप उडवणारा VIDEO तुमची या फोटोवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.