नवी दिल्ली, 21 जून : अनेक वेळा क्षुल्लक गोष्टीवरून लोक एकमेकांशी इतके भांडतात की वाद हाणामारीपर्यंत पोहोचतो. सोशल मीडियावरही दोन गटातील किंवा दोन लोकांमध्ये झालेल्या भांडणाचे धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यात कधी कोणी लाथा-बुक्क्या मारताना, तर कोणी लाठ्या-काठ्या मारताना दिसतात. पण तुम्ही कधी कुणाला जिवंत सापा ने मारहाण करताना पाहिलं आहे का? असाच धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. साप म्हणताच अनेकांच्या अंगाला घाम फुटतो. पण जर एखादी व्यक्ती रागात असेल तर तिच्यासमोर सापही काहीच नाही, हे या व्हिडीओत दिसतं. ज्यात रस्त्यावर मारहाणीदरम्यान एका व्यक्तीने चक्क जिवंत साप आपल्या हातात घेतला आणि समोरच्या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात केली. जिवंत सापाने माणसाने माणसाला केलेल्या मारहाणीच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Shocking! खेळणं म्हणून अवाढव्य अजगरासोबत खेळत राहिला चिमुकला, शेवटी…; थरकाप उडवणारा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या मधोमध दोन व्यक्ती आपसात लढत आहेत. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करत आहे. पण त्या व्यक्तीच्या हातात जिवंत साप आहे. एखादी काठी किंवा चाबकाने मारावं तसं ही व्यक्ती त्या व्यक्तीला जिवंत सापाने फटके मारत आहे. काही वेळातच तिथं पोलीस दाखल होतात. पोलिसांना पाहताच ती व्यक्ती आपल्या हातातील साप खाली फेकून देते आणि पोलिसांसमोर आपले दोन्ही हात वर करून पोलिसांना शरण जाते. Fights & Wild Content नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. स्ट्रिट फायटिंगवेळी व्यक्तीने जिवंत सापाला बाहेर काढलं, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे. बापरे बाप! केसात लपून बसला साप, तरुणाने डोक्याला हात लावला अन्…; Shocking Video Viral हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. एका युझरने नशीब त्याने सोबत गेंडा नेला नव्हता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका युझरने या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर काय वाटलं, तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.