जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! खेळणं म्हणून अवाढव्य अजगरासोबत खेळत राहिला चिमुकला, शेवटी...; थरकाप उडवणारा VIDEO

Shocking! खेळणं म्हणून अवाढव्य अजगरासोबत खेळत राहिला चिमुकला, शेवटी...; थरकाप उडवणारा VIDEO

अजगरासोबत चिमुकला (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

अजगरासोबत चिमुकला (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

अवघ्या 2 वर्षांचा चिमुकला 10 फूट अवाढव्य अजगरासोबत बिनधास्तपणे खेळताना दिसला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जून : समोर साधा छोटा बिनविषारी साप दिसला तरी आपल्याला धडकी भरते. अजगर तर दूरचीच गोष्ट. अजगराला आपण प्रत्यक्षात सोडा पण टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो. असं असताना एक चिमुकला मात्र बिनधास्तपणे अशा अजगरासोबत खेळताना दिसला. अजगरासोबत खेळणाऱ्या लहान मुलाचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आता तुम्ही म्हणाल की हा खेळण्यातील अजगर असावा. कारण खेळण्यांमध्येही आता असे बरेच नकली प्राणी पाहायला मिळतात. पण नाही हा खराखुरा जिवंत महाकाय अजगर आहे. अवघ्या दोन वर्षांचा चिमुकला त्याच्यासोबत खेळताना दिसला. कधी त्याचं तोंड हातात धरणं, कधी त्याच्यावर बसणं असं काही ना काही हा चिमुकला करत होता. साध्याभोळ्या गायीने उधळून लावला खतरनाक किंग कोब्राचा डाव; गोठ्यात येताच काय केलं पाहा VIRAL VIDEO व्हिडीओत पाहू शकता जसं एखादं खेळणंच असावं असा हा मुलगा या अजगराशी खेळतो आहे. हा मुलगा जवळपास दोन वर्षांचा दिसतो आहे. तर अजगर तब्बल 10 फूट लांबीचा आणि अवाढव्य असा आहे. मुलगा जेव्हा अजगराच्या मध्ये बसतो तेव्हा अजगराने त्याला विळखा घातलेलाही दिसतो. मुलगा आरामात तिथून बाहेर पडतो. त्यानंतर अजगर त्याच्यापासून दूर जाताच. तो पळत जातो आणि त्याचं तोंडच धरतो. अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण अंगावर अक्षरशः काटा येतो. अजगर तो शेवटी अजगर. या चिमुकल्याला त्याने एका क्षणात गिळंकृतही केलं असतं. त्यामुळे व्हिडीओ पाहिल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या आणि पालकांवर रोष व्यक्त केला आहे. बुटांच्या मागे दडून बसला होता खतरनाक कोब्रा; लोकांना फुटला घाम, केलं ‘हे’ काम @ash_ish_1994 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ इंडोनेशियातील आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात