मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! पाहता पाहता जिवंत हरणाला संपूर्ण गिळलं; अजगराने केलेल्या शिकारीचा थरारक VIDEO

बापरे! पाहता पाहता जिवंत हरणाला संपूर्ण गिळलं; अजगराने केलेल्या शिकारीचा थरारक VIDEO

हरणाची शिकार करणारा अजगर कॅमेऱ्यात कैद झाला.

हरणाची शिकार करणारा अजगर कॅमेऱ्यात कैद झाला.

हरणाची शिकार करणारा अजगर कॅमेऱ्यात कैद झाला.

    जयपूर, 15 सप्टेंबर : अजगर (Python video) आपली संपूर्ण शिकार जशीच्या तशी गिळतो हे आपल्याला माहिती आहेत. पण शिकारीचा असा व्हिडीओ प्रत्यक्षात पाहायला मिळणं म्हणजे दुर्मिळचं. अजगराने केलेल्या अशाच एका शिकारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात अजगराने एका हरणाला (Deer video) जिवंत गिळलं आहे (Python swallowed deer alive). हरणाची शिकार करणारा अजगर कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ परदेशातील नव्हे तर भारतातीलच आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) घडलेली ही घटना आहे. बारां जिल्ह्यातील किशनगंज वनक्षेत्रात अजगराने हरणाची शिकार केली आहे. माहितीनुसार लालापुरा प्लांटेशनमध्ये अजगराने हरणाला विळखा घातला. त्यावेळी तिथं बरेच लोक होते. त्यांनी हे दृश्यं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होतो आहे. हे वाचा - माकडासोबत सेल्फी पडला महागात! तरुणावर कसा खतरनाक हल्ला केला पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एका शेताजवळ अजगराच्या तोंडात हरण दिसत आहे. हरणाचा काही भाग अजगराच्या तोंडात केला आहे. अजगराने हरणाच्या निम्म्या शरीराला विळखा घातला आणि निम्म शरीर त्याच्या तोंडात आहे. हळूहळू तो या हरणाला गिळतो आहे.  या अजगराने हरणाला संपूर्ण गिळलं आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला असं सांगितलं जातं आहे. याबाबत वनविभागालाही माहिती देण्यात आली. हे वाचा - VIDEO - तडफडत होतं इवलं बदक; कुत्र्याच्या पिल्लाने जे केलं ते पाहून व्हाल भावुक काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये एका अजगराने एका कोल्ह्यासारख्या प्राण्यालाही गिळलं होतं. करौली जिल्ह्यातील कौंडर गावात ही घटना घडली होती. ग्रामस्थांनी अजगरला पकडून त्याला एका झाडाला बांधून ठेवलं आणि वनविभागाला बोलावून नंतर त्यांच्या ताब्यात दिलं. वनविभागाने त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Deer, Python, Rajasthan, Snake video, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या