मुंबई, 15 सप्टेंबर : कुठे फिरायला गेलो की फोटो काढणं आलंच. बहुतेक पर्यटनस्थळी माकडं (Monkey) असतात. त्यामुळे या माकडांसोबत (Monkey video) फोटो (Photo with monkey) काढण्याचा मोह आवरत नाही. माकडासोबत पोझ देत किती तरी जण सेल्फी (Selfie with monkey) काढताना दिसतात. पण माकड हा तितका भयंकर प्राणी नसला तरी तो खतरनाक ठरू शकतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
एका माकडाने एका तरुणावर हल्ला केला आहे. हा तरुण माकडासोबत सेल्फी घेत होता आणि माकडासोबतचा हाच सेल्फी त्याला चांगलाच महागात पडला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता माकड एका ठिकाणी शांत बसलं आहे. तरुण त्या माकडाजवळ जातं आणि फोटो काढत असतो. तो पोझ देऊन फोटो काढायला तयार असतो. माकडाचं त्या तरुणाकडे लक्ष नाही आहे. ते त्याच्याकडे पाठ करून बसलं आहे. इतक्यात दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती येते आणि ती माकडाच्या पाठीवरून हात फिरवतं.
हे वाचा - VIDEO - तडफडत होतं इवलं बदक; कुत्र्याच्या पिल्लाने जे केलं ते पाहून व्हाल भावुक
आपल्याला कुणीतरी स्पर्श केला म्हणून माकड मागे वळून पाहतं, ते खूप रागात असतं. त्याचवेळी त्याच्यासोबत फोटो काढणारा तरुणही त्याच्याकडे पाहतो. तेव्हा त्या दोघांच्या आजूबाजूला दुसरं कुणीच नसंत. त्यामुळे त्या तरुणानेच आपल्याला छेडलं असं समजून माकड त्याच तरुणावर हल्ला करतो. माकड तरुणाच्या हाताला पकडतो आणि जोरात चावतो.
हे वाचा - मृत पिल्लाला सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण; VIDEO पाहून पाणावतील डोळे
videolucu.funny इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून धक्काही बसतो पण हसूही आवरत नाही. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Other animal, Viral, Viral videos