Home /News /viral /

VIDEO - डोळ्यांसमोर तडफडत होतं इवलंसं बदक; कुत्र्याच्या पिल्लाने जे केलं ते पाहून व्हाल भावुक

VIDEO - डोळ्यांसमोर तडफडत होतं इवलंसं बदक; कुत्र्याच्या पिल्लाने जे केलं ते पाहून व्हाल भावुक

अगदी माणसांनाही विचार करायला भाग पाडेल असा हा व्हिडीओ आहे.

    मुंबई, 15 सप्टेंबर : अनेकदा माणूसही माणसासारखा वागत नाही. पण प्राणी (Animal video) मात्र असं काही करतात की ते पाहून माणसांनाही लाज वाटेल. माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही भावना असतात. पण माणसाप्रमाणे प्राणी मात्र आपलं मन कठोर करत नाही. जेव्हा समोर एखादं कुणीतरी संकटात दिसतं ते धावून जातात. अशाच एका कुत्र्याचा (Dog video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याने बदकाची (Duck video) मदत केली आहे. एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाने बदकाच्या इवल्याशा पिल्लाची मदत केली (Dog help duck video). कुत्र्यांच्या पिल्लू (Little dog) लहान आहे पण त्याने जे काम केलं ते खूप मोठं आहे. अगदी माणसांनाही विचार करायला भाग पाडेल असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता, कुत्र्याचं पिल्लू एका ठिकाणी बसलेलं आहे. त्याच्यासमोर एक छोटंसं बदकाचं पिल्लू आहे. जे जमिनीवर उलटं झालं आहे. म्हणजे त्याची पाठ जमिनीवर आणि पाय वर अशा अवस्थेत तो आहे. हे वाचा - थेट सफारी गाडीवरच चढला चित्ता आणि...; नॅशनल पार्कमधील धडकी भरवणारा VIDEO VIRAL सरळ होण्यासाठी ते बदक धडपड करत आहे. पण त्याला सरळ काही होता येत नाही.  कुत्रा सुरुवातीला त्याच्याकडे पाहत राहतो. पण त्याला बदकाची तडफड फार वेळ पाहवत नाही. तो लगेच बदकाच्या मदतीसाठी धावून येतो. आपल्या तोंडाने तो बदकाला सरळ करतो. त्यानंतर बदक त्याच्याच शेजारी उभं राहतं. कुत्रा बदकाच्या पाठीवर हात ठेवून उभं राहतं. जणू काही दोघं दोस्तच आहेत. हे वाचा - VIDEO: खरी मैत्री; कुत्र्याला वाचवण्यासाठी मांजरीनं केलेलं काम पाहून नेटकरी थक्क आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एक छोटीशी मदत कुणाचं तरी आयुष्य बदलू शकते, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dog, Pet animal, Viral, Viral videos

    पुढील बातम्या