जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कपड्याच्या दुकानातील ट्रायल रूमचं छत तोडून आत शिरला अजगर; रेस्क्यू टीमवरच हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

कपड्याच्या दुकानातील ट्रायल रूमचं छत तोडून आत शिरला अजगर; रेस्क्यू टीमवरच हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

कपड्याच्या दुकानातील ट्रायल रूमचं छत तोडून आत शिरला अजगर; रेस्क्यू टीमवरच हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

एका स्टोरमध्ये एक अजगर ट्रायल रूमचं छत तोडून आतमध्ये शिरल्यानंतर एकच गोंधळ उडाला (Python in Roof of Changing Room). हा अजगर तिथे कसा पोहोचला, हे माहिती नाही

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : कपडे खरेदी करण्यासाठी आपण जेव्हा एखाद्या दुकानात जातो, तेव्हा कपडे घेण्याआधी ते ट्राय करून बघतो. हे कपडे आपल्याला व्यवस्थित बसल्यावर आणि आपल्यावर चांगले दिसल्यावरच आपण खरेदी करतो. मात्र, एका स्टोरमध्ये एक अजगर ट्रायल रूमचं छत तोडून आतमध्ये शिरल्यानंतर एकच गोंधळ उडाला (Python in Roof of Changing Room). हा अजगर तिथे कसा पोहोचला, हे माहिती नाही. मात्र, तो ट्रायल रूममधून बाहेर पडायला तयार नव्हता. रेस्क्यूसाठी आलेल्या टीमवरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला (Python Shocking Video). काळीज होईल धस्स! टोलेजंग इमारतीच्या बाल्कनीच्या टोकाला उभं राहून व्यायाम या अजगराला जेव्हा जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तो भडकला. आधी तर ज्या बिळात तो जाऊन बसला होता, तिथून त्याला बाहेर काढणंच मोठं आवाहन होतं. नंतर अजगर रेस्क्यूसाठी आलेल्या व्यक्तीवरच हल्ला करू लागला.

जाहिरात

कपड्यांच्या मधून जात तो छताच्या आतमध्ये कधी शिरला (Python sneaked inside roof) हे समजलंही नाही. यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. काही वेळातच रेस्क्यू टीम तिथे पोहोचली. यावेळी हा अजगर छताच्या फॉल सिलिंगमध्ये बसलेला होता. हे तोडताच अजगर डोळ्यांसमोर दिसू लागला. तो इतका भडकलेला दिसत होता, जणू समोर कोणी येताच एखाद्याला कच्चं खाईल. फॉल सिलिंगमधून खाली लटकलेला हा अजगर अतिशय भयानक रूपात दिसत होता. तो वारंवार आपलं तोंड उघडून रेस्क्यू टीमच्या सदस्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. रेस्क्यू टीमने त्याला खाली पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र खाली पडताच अजगर आणखीच आक्रमक झाला. मुंबईत राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेतून असा बचावला तरुण, खतरनाक Live Video व्हायरल बराच वेळ अथक प्रयत्न केल्यानंतर अजगराला पकडण्यात रेस्क्यू टीमला यश आलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी रेस्क्यूच्या या पद्धतीबाबत सवाल उपस्थित केले आहेत. स्नेक हुक न वापरल्यामुळे अनेकांनी हा व्यक्ती हिरोपंती दाखवत असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात