मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे बापरे! छप्पर तोडून बाहेर पडला घरात दडून बसलेला अजगर आणि...; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा

अरे बापरे! छप्पर तोडून बाहेर पडला घरात दडून बसलेला अजगर आणि...; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा

घरात घुसून लपून बसलेला अजगर अचानक बाहेर पडला आणि...

घरात घुसून लपून बसलेला अजगर अचानक बाहेर पडला आणि...

घरात घुसून लपून बसलेला अजगर अचानक बाहेर पडला आणि...

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 01 डिसेंबर : घरात साधं झुरळ किंवा पाल दिसली तरी कित्येकांना घाम फुटतो. या छोट्याशा किटकांचीहीदेखील अनेकांना भीती वाटते. मग विचार करा जर तुमच्या घरात झुरळ, पाल नव्हे तर भलामोठा अजगर (Python) असेल तर. फक्त वाचूनच काळजात धडकी भरली ना? मात्र असाच एक व्हिडीओ (Python video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात चक्क एका घराच्या छतात एक महाकाय अजगर दडून बसला होता (Python in roof video) .

घरात घुसलेल्या एका अजगराचा व्हिडीओ समोर आला आहे. घराच्या छतामध्ये हा अजगर लपून बसला होता. एक व्यक्ती छत तोडून या अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी अजगर धाडकन जमिनीवर कोसळतो. पुढे जे घडलं ते पाहून धडकीच भरते. अंगावर अक्षरशः काटा येतो.

व्हिडीओत पाहू शकता अजगर छतातून बाहेर पडताच त्याचा आकार पाहूनच घाम फुटतो. तरुण त्या अजगराला आपल्या नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करतो. जसा छतातून बाहेर आला तसा हा अजगर चवताळला. त्या तरुणावर तो हल्ला करतानाही दिसतो. तरुणाला दंश करण्याचा प्रयत्न करतो.

हे वाचा - भलीमोठी अंडी गिळण्यासाठी सापाची धडपड; अंगावर काटा आणणारा VIDEO

अजगर इतका विशाल आहे की तरुणाला तो आवरता येत नाही आहे. कसंबसं करून तो त्या अजगराचं तोंड पकडतो आणि त्या अजगराला धरतो. त्याचवेळी हा तरुण हात हलवतानाही दिसतो. कदाचित झटापटीत या अजगराने त्याला चावा घेतला असावा.

हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे, हे नेमकं माहिती नाही. बेस्ट व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  छतामध्ये असा अजगर दडून बसल्याची ही पहिलीच घटना नाही.  याआधी डिसेंबर 2020 मध्ये थायलँडमध्येही टॉयलेटमध्ये छतातून असाच एक अजगर बाहेर आला होता. फिटशनूलोक शहरातील एका रेस्टॉरटमधील ही घटना.

रेस्टॉरंटमध्ये काम करणारा कर्मचारी बाथरूममध्ये गेला. नोप पोविन असं या कर्मचाऱ्याचं नाव. नोपनं बाथरूमचा दरवाजा उघडला आणि त्याला मोठा धक्काच बसला. त्याने काय कुणीच स्वप्नात कल्पना केली नसेलं असं त्याला प्रत्यक्षात दिसलं. त्याच्यासमोर एक भलामोठा अजगर होता. हा अजगर छताला लटकत होता. जवळपास 8 फूट लांबीचा हा अजगर. पोविननं त्याचा व्हिडीओ बनवला. अजगराला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला.

हे वाचा - नेहमी उच्छाद मांडणाऱ्या माकडाने केलं असं काम; VIDEO पाहून माणसांनाही वाटेल लाज

काही वेळ हा अजगर असाच लटकत होता. त्याला आपली शिकार काही सापडली नाही. मग तो पुन्हा त्या छताच्या आत गेला. यानंतर पोविननं पोलीस आणि रेस्क्यू टिमला याची माहिती दिली.

First published:

Tags: Python, Python snake, Viral, Viral videos