जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नेहमी उच्छाद मांडणाऱ्या माकडाने केलं असं काम; VIDEO पाहून माणसांनाही वाटेल लाज

नेहमी उच्छाद मांडणाऱ्या माकडाने केलं असं काम; VIDEO पाहून माणसांनाही वाटेल लाज

नेहमी उच्छाद मांडणाऱ्या माकडाने केलं असं काम; VIDEO पाहून माणसांनाही वाटेल लाज

माकडाने आजोबांसोबत असं काही केलं की पाहून तुम्हीही कौतुक कराल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 डिसेंबर : माकडांना (Monkey video) आपण नेहमी उच्छाद मांडताना, माणसांना त्रास देताना पाहिलं आहे. माकड म्हणजे खोडकर, मस्तीखोर अशीच त्याची ओळख. पण सध्या अशाच एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल होतो, जो पाहून माणसांनाही लाज वाटेल. कारण जे काम एरवी माणसं करताना दिसत नाहीत ते काम या माकडाने करून दाखवलं आहे (Monkey humanity video). सोशल मीडियावर (Social media) या माकडाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. माकड असलं तरी त्यात माणुसकी दडली आहे हेच या व्हिडीओतून दिसून येतं. एका आजोबांसोबत या माकडाने असं काही केलं की पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल. व्हिडीओ पाहून तुम्हीही या माकडाला शाबासकी द्याल आणि माकडाबाबत  आपल्या नजरेतील त्याची प्रतिमाही बदलेल (Monkey holding stick to old man).

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता एक माकड एका ठिकाणी बसलेलं आहे. त्याच्यासमोर एक काठी आहे. माकडासमोर रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती आहे. त्या वृद्ध व्यक्तीला ती काठी हवी असते, त्यामुळे ती तिथं येते. कदाचित या वृद्ध व्यक्तीला फार खाली वाकता येत नसावं त्यामुळे ती माकडाकडे हात करून काठी देण्याचा इशारा करते. हे वाचा -  WOW! डॉल्फिनने गाण्यावर लगावले जबरदस्त ठुमके; Dolphin चा Dance video एकदा पाहाच आता माकडाच्या स्वभावाप्रमाणे तो काहीतरी खोडकरपणा करेल असंच आपल्याला वाटतं. पण त्याने तर सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. माकड शांतपणे काठीजवळ जातं. काठी हातात घेत आणि त्या आजोबांच्या हातात देतं. पण त्याचवेळी त्याला आपण दिलेल्या या काठीने हे आजोबा आपल्यला मारणार तर नाहीत याची भीतीही वाटते. त्यामुळे आजोबांच्या हातात काठी ठेवताच ते लगेच तिथून मागे पळतं आणि त्या वृद्ध व्यक्तीपासून दूर उभं राहतं. हे वाचा -  सोंडेत धरली गाडी आणि…; चवताळलेल्या हत्तीचा पर्यटकांवर खतरनाक हल्ला; पाहा VIDEO माकडांचे तसे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण असा व्हिडीओ क्वचित पाहिला असावा. beautiffulgram इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या माकडाचं नेटिझन्सनी कौतुक केलं आहे. प्राण्यांमध्ये माणुसकी आहे पण आता माणसांमध्ये माणुसकी राहिली नाही.  अशी कमेंट एका युझरने दिली आहे. खरंच हे छोटंसं माकड खूप काही शिकवून जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात