मराठी बातम्या /बातम्या /Viral /भलीमोठी अंडी गिळण्यासाठी सापाची धडपड; अंगावर काटा आणणारा VIDEO

भलीमोठी अंडी गिळण्यासाठी सापाची धडपड; अंगावर काटा आणणारा VIDEO

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा सापाचा हा व्हिडिओ भीतादायक आहे. आजपर्यंत तुम्ही कधी विचारही केला नसेल की नागाचं तोंड इतकं मोठं होऊ शकतं.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा सापाचा हा व्हिडिओ भीतादायक आहे. आजपर्यंत तुम्ही कधी विचारही केला नसेल की नागाचं तोंड इतकं मोठं होऊ शकतं.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा सापाचा हा व्हिडिओ भीतादायक आहे. आजपर्यंत तुम्ही कधी विचारही केला नसेल की नागाचं तोंड इतकं मोठं होऊ शकतं.

नवी दिल्ली 01 डिसेंबर : अजगराबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की कितीही मोठी गोष्ट असली तरी तो अगदी सहज गिळून घेतो. सापही याच प्रजातीचा प्राणी आहे. त्यामुळे अनेकदा सापही मोठमोठी शिकार गिळताना दिसतात. सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल (Scary Video of Snake) झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक साप मोठं अंडं गिळताना दिसतो (Snake Swallow Egg). ज्यापद्धतीने तो आपल्या लहानशा तोंडाने इतकं मोठं अंडं गिळतो, ते पाहून अंगावर काटा येतो.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा सापाचा हा व्हिडिओ भीतादायक आहे. आजपर्यंत तुम्ही कधी विचारही केला नसेल की नागाचं तोंड इतकं मोठं होऊ शकतं. मात्र व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला जाणवेल की साप त्यापेक्षाही जास्त घातक असतात, जितका तुम्ही विचार करता. हा भीतीदायक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला या सापाच्या क्षमतेबद्दल समजेल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक साप अशा जागी आहे, जिथे दोन मोठमोठी अंडी ठेवलेली आहेत. यादरम्यान काळ्या रंगाच्या सापाचं लक्ष या अंड्यांकडे जातं. हा साप हळूहळू अंड्यांकडे जाते आणि अंडी गिळण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तो ज्याप्रमाणे आपलं तोंड अंड्याप्रमाणे मोठं करत जातो, ते पाहून तुम्हीही घाबराल. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की अंडं मोठं असल्याने सापाला ते सहज खाता आलं नाही. यामुळे हळूहळू सापाने आपलं खरं रूप दाखवलं, जे अतिशय भीतीदायक होतं.

व्हिडिओच्या शेवटी दिसतं की साप आपलं तोंड इतकं मोठं करतो की संपूर्ण अंडं तो गिळून घेतो. यादरम्यान त्याच्या तोंडाच्या आसपासची त्वचा अतिशय पातळ होते. त्याच्या त्वचेमधूनही अंडं दिसू लागतं. सापाचं हे रूप अतिशय भीतीदायक दिसतं. व्हिडिओ ट्विटरवर @Animal_WorId नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Snake video