जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Wedding Video: लग्न पद्धतीला 360 डिग्री फिरवलं; आलेले पाहुणेही हैराण

Wedding Video: लग्न पद्धतीला 360 डिग्री फिरवलं; आलेले पाहुणेही हैराण

Wedding Video: लग्न पद्धतीला 360 डिग्री फिरवलं; आलेले पाहुणेही हैराण

मुलीने स्वत:च्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकजणं हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

Bride Groom Viral Video: गेल्या काही वर्षात लग्नाच्या पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. काही दाम्पत्य मात्र लग्न अत्यंत साध्या पद्धतीने करणं पसंत करतात. काही लोक मात्र धुमधडाक्यात लग्न (Marriage) पार पाडतात. आपण अनेक लग्नांना हजेरी लावतो. मात्र अनेकांच्या लग्न पद्धती तुम्हाला विचार करायला भाग पडतात. नवरनेवाने नवरीच्या भांगेत भरलं कुंकू… गेल्या अनेक वर्षांपासून आतापर्यंत केली जाणारी लग्न पद्धती फॉलो करीत आहोत. हिंदू धर्माच्या लग्न पद्धतीनुसार नवरीच्या भांगेत कुंकू भरलं जातं. मात्र नवरीने नवऱ्याच्या माथ्यावर कुंकू लावल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? लग्नाचा नवा व्हर्जन ऑनलाइन व्हायरल… सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असच काहीस पाहायला मिळत आहे. जुन्या पद्धती मागे सोडून एका तरुणीने आपल्याच होणाऱ्या पतीच्या भांगेत कुंकू भरलं. लग्नाच्या मंडपात नवरा आणि नवरी बसलेले आहेत. पहिल्यांदा नवरा आपल्या नवरीच्या भांगेत कुंकू भरतो आणि यानंतर नवरीदेखील हातात कुंकू घेऊन नवरदेवाच्या माथ्यावर कुंकू लावते. लग्नाचा हा नवा व्हर्जन ऑनलाइन व्हायरल होत आहे.

जाहिरात

5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडीओ… ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये नवरी आपल्या लग्नातील बदलांबाबत सांगते. आपल्या लग्नाला कशा पद्धतीने प्रगतीशील ठेवावे, ती याबाबत म्हणते. ती आपल्या लग्न पद्धतीच्या बदलांबाबत बोलते. पतीच्या माथ्यावर कुंकू लावण्यापासून ते कन्यादान करण्यापर्यंत व्हिडीओमध्ये बदलत्या लग्न पद्धती दाखविण्यात आल्या आहेत. क्लिपला 5 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. हा व्हिडीओ @BrahmaandKiMaa यांनी शेअर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात