नवी दिल्ली 14 एप्रिल : भारतात लग्न सोहळे हे अगदी भव्यदिव्य असे साजरे केले जातात. काही ठिकाणी तर तीन किंवा अगदी चार दिवसही लग्न सोहळा सुरू असतो. हळद, संगीत कार्यक्रम, फेरे असे अनेक विधी लग्नांमध्ये पार पडतात. मात्र, लग्नात नाचण्याची मजा काही औरच असते. दोन्ही बाजूचे कुटुंबीय, मित्र मंडळी सगळे एकत्र येऊन वरातीमध्ये नाचताना (Indian Wedding Dance) दिसतात. कित्येक ठिकाणी वरात नसली, तरी वेडिंग हॉलमध्ये नाच-गाण्यासाठी विशेष कार्यक्रम ठेवला जातो. अशाच एका लग्नातील वधूच्या वडिलांचा डान्स (Bride’s Father Dance Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. Dadi Smile Viral: 104 वर्षांच्या आजीच्या किलर हसूने युजर्सला लावलंय वेड! सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, लग्नातील वधूपिता चक्क पुष्पा-द राईज या दाक्षिणात्य चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ या गाण्यावर डान्स (Bride’s Father dance on O Antava) करताना दिसत आहे. यामध्ये त्याच्यासोबत इतर लोकही नाचत आहेत. मात्र, ज्या जोमाने वधूपिता नाचताना दिसत आहे, तो अन्य कुणामध्येच दिसत नाही. वधूपित्याची ही एनर्जी आणि डान्स यामुळेच हा व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर (O antava wedding dance viral video) करत आहेत. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-द राईज’ (Pushpa-The rise Movie) हा मूळचा दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्येही सुपरहिट ठरला. या चित्रपटातील गाणीदेखील मोठ्या प्रमाणात फेमस झाली आहेत. ‘ऊ अंटावा’ (O antava song) हे यातीलच एक आयटम साँग आहे, ज्यात साऊथची ग्लॅमरस अभिनेत्री समंथाने दिलफेक नृत्य केलं आहे.
4 लाखांहून अधिक व्ह्यूज अनुषा वेडिंग कोरियोग्राफी (Anusha Wedding Choreography) नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. ‘व्हेन ब्राईड्स फादर टेक्स ओव्हर दी डान्स फ्लोअर’ अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमधील वधूपित्याचा डान्सही या कॅप्शनला साजेसा असाच आहे. या व्हिडिओला तब्बल 4 लाखांहून अधिक व्ह्यूज (O Antava dance viral) मिळाले आहेत, आणि ही संख्या वाढतच चालली आहे. कित्येक लोकांनी कमेंट्समध्ये या वधूपित्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे, तर कित्येकांनी या वयातही त्यांच्यामध्ये असलेली एनर्जी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. अवघे 5 सेकंद अन् पाचही मित्र थेट जमिनीत; पंक्चरच्या दुकानातील धक्कादायक Video लग्नामध्ये डान्सचा ट्रेंड हल्ली लग्नांमध्ये विशेष कोरिओग्राफी करून डान्स बसवण्याचा ट्रेंड आहे. यासाठी कित्येक लोक लग्नाअगोदर महिनाभरापासून डान्स शिकतात. कित्येक कोरिओग्राफरही (Viral Wedding dance) केवळ लग्नासाठी खास असे डान्स बसवून देतात. तसेच, कित्येक वेडिंग प्लॅनर्स आपल्या पॅकेजमध्ये कोरिओग्राफरही उपलब्ध करून देतात. यामुळे लग्नामध्ये आता केवळ ‘नागिन डान्स’च नाही, तर इतर सर्व प्रकारचे डान्स पहायला मिळत आहेत.

)







