जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! वर्षातले तब्बल 300 दिवस झोपतो पुरखाराम; कारण वाचून खिन्न व्हाल!

बापरे! वर्षातले तब्बल 300 दिवस झोपतो पुरखाराम; कारण वाचून खिन्न व्हाल!

बापरे! वर्षातले तब्बल 300 दिवस झोपतो पुरखाराम; कारण वाचून खिन्न व्हाल!

सुरूवातीला पुरखाराम जवळजवळ 5 ते 7 दिवस सलग झोपायचे. परंतु आता मात्रं सलग 25 दिवस तो झोपलेलेच असतात.

    नागौर, 12 जुलै : काही जणांना झोप अत्यंत प्रिय असते, तर काहीजण रविवारी संपूर्ण दिवस झोप घेतात. पण प्रत्येकाच्या झोपेला प्रमाण असते. कोणतीच व्यक्ती संपूर्ण 24 तास झोपू शकत नाही. पण राजस्थानमधील (Rajasthan) नागौर (Nagaur) जिल्ह्यात गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीची माहिती समोर आलेली आहे. हा माणूस महिन्यातील तब्बल 20 ते 25 दिवस झोप घेतो, म्हणजेच वर्षातून 300 दिवस हा झोपलेलाच असतो. डॉक्टरांनी त्याला एक गंभीर आजार असल्याचे सांगितले आहे. या व्यक्तीचे नाव पुरखाराम (Purkharam) असे आहे. ते 42 वर्षांचे आहेत. तो राजस्थानमधील जोधपूर विभागात असलेल्या नागौर जिल्ह्याच्या परबतसर उपखंडातील भादवा (Bhadwa) गावात वास्तव्यास आहे. त्याचं एक किराणा मालाचं दुकानही आहे. पण त्याच्या झोपेच्या गंभीर आजारामुळे तो महिन्यातील केवळ पाचच दिवस ते उघडू शकतो. सुरूवातीला पुरखाराम जवळजवळ 5 ते 7 दिवस सलग झोपायचे. परंतु आता मात्रं सलग 25 दिवस तो झोपलेलेच असतात. त्याचं खाणं, पिणं, अंघोळ वगैरे सगळं तो झोपेतच करतो. त्याला टॉयलेट सीटवरही त्याच्या घरचे बसवून देतात. त्याच्या या गंभीर आजारामुळे त्याच्या घरचे अतिशय त्रासले आहेत. डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी पुरखारामला असलेल्या एक्सिस हायपरसोम्निया (Exes Hypersomnia) या झोपेसंबंधित आजाराबद्दल सांगितले. तो या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात मोडतो, ज्यामध्ये रूग्ण जवळजवळ काही आठवडे झोपेतून उठत नाहीत. हे ही वाचा- VIDEO : दोन्ही दिशेला गाड्या आणि मध्ये महाकाय 20 फुटांचा अजगर; गावकरी भयभीत मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच पुरखाराम रविवार (11 जुलै 2021) ला 11 दिवसांनी उठलेला आहे. अत्यंत प्रयत्नाने त्याची पत्नी लिछमी देवीने त्याला उठवले आहे. पुरखारामचे म्हणणे आहे की त्याला झोपायला आवडत नाही, तो झोपेवर कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. पण त्याचे शरीर त्याला साथ देऊ शकत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, जर त्याने खाणे-पिणे सोडले तर त्याला झोप येत नाही. पण खाणे- पिणे सोडणे देखील शक्य नाही. त्याला हा आजार 23 वर्षांपासून आहे. पण 2015 पासून त्याच्या या आजारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. आत्तापर्यंत खूप उपचार करून झाले पण काही उपयोग झाला नाही. आता जे होईल ते देवालाच माहित, असे पुरखाराम म्हणत आहे. पण त्याची आई कंवरी देवी आणि पत्नी लिछमी देवी यांचा विश्वास आहे की तो लवकर ठीक होईल. एक्सिस हायपरसोम्निया (Exes Hypersomnia) आजार म्हणजे काय व यावरील उपाय हायपरसोम्निया म्हणजे अति प्रमाणात झोपणे. याबाबतीत फिजिशियन डॉक्टर बी. आर. जांगीड यांनी सांगितले की हा आजार खूप कमी लोकांना होतो. रूग्णाला याआधी ट्यूमर(Tumor) किंवा डोक्याला गंभीर दुखापत (head Injury) झाली असेल तर हा आजार उद्भवतो. अशा आजारांचा मानशास्त्रीय आजारांमध्ये (Psychological Disorder) उल्लेख केला जातो. या आजारावर दोन प्रकारे उपचार सांगितले जातात. डॉक्टर रूग्णाची झोप नियंत्रित करण्यासाठी काही विशिष्ट औषधे किंवा रूग्णांच्या झोपेचे स्वरूप बदलण्यास सांगितले जाते. झोपण्याआधी आणि झोपेतून उठल्यानंतर रूग्णांना पाळावयची तथ्ये, आहाराबद्दल माहिती दिली जाते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात