• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : जंगलाच्या रस्त्याने घराकडे निघाले होते तरुण; रस्त्यात दिसलेला महाकाय प्रकार पाहून गावकरीही भयभीत

VIDEO : जंगलाच्या रस्त्याने घराकडे निघाले होते तरुण; रस्त्यात दिसलेला महाकाय प्रकार पाहून गावकरीही भयभीत

गाडीतील एका तरुणाने या घटनेचा VIDEO शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 • Share this:
  हिमाचल प्रदेश, 12 जुलै : पावसाला सुरुवात झाल्यानंतर जंगलाशेजारी भागांमध्ये साप, अजगर आदी प्राण्यांचा वावर वाढू लागतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा गावांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जातं. पावसाळ्यात गावकऱ्यांना दहशतीखाली जगावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हादराल. या व्हिडीओमध्ये तब्बल 20 फुटांचा अजगर दिसून येत आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील रामपुर गावात रविवारी रात्री तब्बल 20 फुट लांब अजगर पाहून (20 Feet Long Python) गावकरी पुरते भयभीत झाले. सापांचा राजा अजगर हा रस्ता क्रॉस करीत होता. लोकांनी जेव्हा अजगराला रस्त्या पार करताना पाहिलं तर सर्वांनी आपल्या गाड्या थांबवल्या. अजगराला जाताना काही अडथळा येऊ नये म्हणून दोन्ही बाजूला गाड्या थांबल्या होत्या. अजगर जंगलात गेल्यानंतर गावकऱ्यांनी गाड्या सुरू केल्या व ते रस्तावरुन जाऊ लागले. इतका विशाल अजगर पाहिल्यानंतर गावकरी भयभीत झाले आहे. मात्र गावकरी आणि जंगलातील प्राण्यांमधील नातं असच काहीसं असतं. हे ही वाचा-उंदरांसाठी घरात ठेवला पिंजरा, सकाळी पाहिलं तर कुटुंबाला धक्काच बसला, पाहा VIDEO सध्या जंगल तोडून तेथे वस्ती होत आहे. अशा वेळी प्राण्यांसाठी जागा कमी पडू लागली आहे. शिवाय जंगलतोडीमुळे निसर्गावरही त्याचा दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे तुम्ही जर प्राण्यांना त्रास दिला नाही तर ते तुम्हाला काही करणार नाही, असं प्राणीमित्रांकडून सांगितलं जातं. या व्हिडीओमधूनदेखील हेच दिसतं. गावकऱ्यांनी गाड्या थांबवल्यामुळे अजगर आपोआप आपल्या मार्गाने जंगलात निघून गेला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: