नवी दिल्ली 25 जुलै: माणसांनी जंगलं (Jungle) नष्ट करत संपूर्ण चक्रच बिघडवलं आहे. जंगलं नष्ट करून माणसांनी घरं बनवली आहेत. अशात आता जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. आपल्या स्वार्थासाठी माणसांनी प्राण्यांचा निवारा हिसकावला आहे. याचा परिणाम म्हणजे जे प्राणी जंगलात लपून राहायचे, ते आता मानवी वस्तीत घुसून माणसांवर हल्ला (Animal Attack) करत आहेत. अमेरिकेतून (America) आता अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे. यात एका महिलेनं दावा केला आहे, की काळ्या वाघिणीनं (Puma Attack) तिच्या मुलावर हल्ला केला आहे. हा हल्ला एका पार्कमध्ये झाला.
...अन् आईनं लहान बाळाला पाण्यात फेकलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले राक्षस
ही घटना 2 मे रोजी घडल्याचं म्हटलं जात आहे. ग्लासगो येथील रहिवाशी असलेल्या महिलेनं Glasgow Live ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की ती आपल्या मुलासोबत Carmyle New Park इथे फिरण्यासाठी गेली होती. तिथे दोघंही हरीण पाहत होते. अचानक तिनं पाहिलं की तिचा मुलगा एका काळ्या कुत्र्याच्या जवळ गेला आहे. तिच्या मुलाला हा कुत्रा असल्याचं वाटलं. मात्र, महिलेनं त्याला पाहताच ओळखलं. ती काळी वाघिण होती. महिलेनं सांगितलं, की या वाघिणीनं तिच्या मुलाकडे झेप घेतली. मात्र, महिलेनं आरडाओरडा करताच ती जंगलाकडे पळाली.
VIDEO: लग्नातच वैतागली नवरीबाई; नवरदेवासोबत केलं असं काही की सगळेच अवाक
महिलेचं असं म्हणणं आहे, की ती पार्कमध्ये आरामात फिरत होती. तिनं असा विचारही केला नव्हता की पार्कमध्ये अशा प्रकारे जंगली प्राणी फिरत असतील. या महिलेच्या म्हणण्यानुसार आता हे पार्क अत्यंत असुरक्षित आहे आणि त्या वाघिणीला न पकडल्यास ती दुसऱ्या कोणावर हल्ला करू शकते. याबाबत बोलताना पार्क व्यवस्थापनानं सांगितलं, की ते वाघिणीचा शोध घेत आहेत. आतापर्यंत त्यांना काही खुना सापडलेल्या नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे, की ही एखादी साधी मांजर असेल जी पार्कमध्ये फिरत असेल.
याप्रकरणी महिलेनं मात्र वाघिणीच्या पायाचे फोटो शेअर केले आहेत. तिनं म्हटलं की इतक्या घाईत ती या प्राण्याचे फोटो घेऊ शकली नाही. पायाचे ठसे कोणत्या मांजरीचे नसल्याचं तिनं म्हटलं. तिनं शेअर केलेले फोटो पाहून लोकंही तिचा दावा खरा असल्याचं म्हणत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack, Black panther, Viral news