नवी दिल्ली 22 जानेवारी : आजपर्यंत असं मानलं जायचं की शरीरातून बाहेर आल्यावर स्पर्म काही सेकंद किंवा मिनिटांसाठीत जिवंत राहतात
(Lifespan Of Sperm). मात्र, आता जी बातमी समोर आली आहे, ती ऐकून कदाचित या फॅक्टबाबत सवाल उपस्थित केले जातील. पॅलेस्टाईनमधील एका दहशतवाद्याने लोकांना सांगितलं की कशाप्रकारे त्या जेलमध्ये राहूनच चार वेळा आपल्या पत्नीला गरोदर केलं. या दाव्यानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. दहशतवाद्याचं म्हणणं आहे, की त्याने जेलमधून टिफिनमध्ये आपले स्पर्म पाठवून पत्नीला चारवेळा प्रेग्नंट केलं.
VIDEO - Surprise म्हणत दरवाजा उघडला पण...; अशा अवस्थेत दिसले पालक की पळाला लेक
पॅलेस्टाईनचा दहशतवादी रफत अल करावी
(Rafat-Al-Qarawi) याने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. रफत मागील 15 वर्षांपासून तुरुंगात बंद आहे. मात्र, यादरम्यान त्याच्या पत्नीने चार मुलांना जन्म दिला. याबाबत बोलताना पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्याने म्हटलं की ही चारही त्याचीच मुलं आहेत. त्याला विचारण्यात आलं, की तू जेलमध्ये असतानाही तुझी पत्नी गरोदर कशी राहिली, यावर उत्तर देताना त्याने धक्कादायक खुलासा केला.
रफतचं असं म्हणणं आहे, की त्याने जेलमधून चिप्सच्या पॅकेटमध्ये आपले स्पर्म भरून पत्नीला दिले होते. हेच स्पर्म त्याची पत्नी आपल्या शरीरात टाकत होती, यातूनच ती चार मुलांची आई झाली. पॅलेस्टाईन अथॉरिटी टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत रफतने हा दावा केला. खरंतर स्पर्म शरीरातून बाहेर आल्यानंतर काहीच काळ जिवंत राहतात. मात्र, या दहशतवाद्याने दावा केला की जेलमधील दहशतवादी याच पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून आपले स्पर्म बाहेर स्मगल
(Sperm Smuggling From Jail) करतात. कॅन्टीनमधून कैदी आपल्या कुटुंबीयांना पाच वस्तू पाठवू शकतात. याच वस्तूंमध्ये कैदी स्पर्मही पाठवतात.
'...असेच पुरुष मला आवडतात', सर्वात उंच Adult Star ने केला शॉकिंग खुलासा
रफतने पुढे खुलासा केला की सामान पाठवण्याची वेळ यायची, त्याच्या काहीच सेकंद आधी ते आपले स्पर्म प्लॅस्टिकमध्ये भरत असे. यानंतर प्लॅस्टिकवर मार्क केलं जातं, की कशात कोणाचे स्पर्म आहेत. पॅलेस्टाईन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, जेलमधून स्मगल करण्यात आलेल्या स्पर्ममधून आतापर्यंत 101 मुलं जन्मली आहेत. मात्र, मेडिकल एक्सपर्ट्सने हे अशक्य असल्याचं म्हटलं आहे. तर तुरुंग प्रशासनानेही हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.