जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये गेलेली पत्नी; बाहेर येताच ते दृश्य पाहून पतीला बसला धक्का

पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये गेलेली पत्नी; बाहेर येताच ते दृश्य पाहून पतीला बसला धक्का

पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये गेलेली पत्नी; बाहेर येताच ते दृश्य पाहून पतीला बसला धक्का

कॅटलिन आपला पती सर्गियो याच्यासोबत गाडीतून कुठेतरी जात होती. याचदरम्यान कॅटलिनला वॉशरूमला जायचं असल्यानं ते पेट्रोल पंपावर थांबले.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : प्रेग्नंसी (Pregnancy) हा कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील सुंदर काळ असतो. यामुळे या काळात प्रत्येकजण काहीतरी खास योजना आणि स्वप्न सजवतो. इतकंच नाही तर महिला डिलिव्हरीसाठी खास कपडेही (Delivery dress) तयार करून घेतात. महिला हेदेखील ठरवतात की कोणत्या रुग्णालयात डिलिव्हरी करायची. अशात बाळाचा जन्म वॉशरूममध्येच (Baby Birth in Washroom) झाला तर? कॅटलिन नावाच्या एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं. पेट्रोल पंपावर वॉशरूमला गेली असता, या महिलेनं बाळाला जन्म दिला. पंगा घेणं आलं कुत्र्याच्या अंगाशी; मांजरीनं अद्दल घडवताच ठोकली धूम, पाहा Video कॅटलिन आपला पती सर्गियो याच्यासोबत गाडीतून कुठेतरी जात होता. याचदरम्यान कॅटलिनला वॉशरूमला जायचं असल्यानं ते पेट्रोल पंपावर थांबले. महिलेच्या पतीलाही याचा अंदाज नव्हता की त्याची पत्नी वॉशरूमला एकटी गेली आहे, मात्र परत येताना तिच्या हातात बाळ असेल. पतीसाठी हे मोठं सरप्राईज होतं, की कॅटलिन वॉशरूममधून आपल्या हातात बाळ घेऊन परतली (Baby born in toilet). कॅटलिन आणि सर्गियो यांचं हे दुसरं मुलं होतं. तिच्यासाठी ही प्रेग्नंसी सामान्य होती. तिला अजिबातही अंदाज नव्हता, की तिचं बाळ अशा पद्धतीनं जन्मेल. फॅमिली ड्राईव्हवर जात असताना या महिलेला टॉयलेटला जाण्याची गरज वाटली. तिच्या पतीनं एका पेट्रोल पंपावर गाडी थांबवली. इथे असलेल्या वॉशरूममध्ये कॅटलिन गेली. १० मिनिटांनी जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्या हातात नवजात बाळ होतं. हे पाहून तिच्या पतीला आश्चर्याचा धक्का बसला. पतीनं याचा व्हिडिओ बनवला. नंतर लगेचच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या बाळ आणि आई दोघंही सुखरूप आहेत. स्विमिंग पुलमध्ये स्टंटसाठी महिलेनं छतावरुन घेतली उडी पण..; Shocking Video हे कपल अमेरिकेच्या टेक्ससमधील आहे. त्यांनी आपली ही अनोखी कहाणी टिकटॉकवर लोकांसोबत शेअर केली. हा व्हिडिओ आतापर्यंत 20 मिलियन लोकांनी पाहिला आहे. जगभरातील लोक या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. अनेकांनी कॅटलिनचं कौतुक केलं आहे. एका यूजरनं लिहिलं, खरंच ही एक मजबूत महिला आहे. आणखी एकानं लिहिलं, तुम्ही जितक्या सहजपणे या बाळाला जन्म दिला ते कौतुकास्पद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात