पाटणा 17 ऑगस्ट : प्रेमात धोका मिळाल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. घटनेत प्रेयसी गर्भवती (Pregnant) झाल्यानंतर प्रियकरानं लग्नास नकार (Lover Refuse to Marry) दिला आहे. यानंतर जेव्हा प्रेयसी लग्नासाठी वारंवार दबाव टाकू लागली तेव्हा आरोपी प्रियकर फरार झाला. ही घटना बिहारच्या (Bihar) गया (Gaya) येथील आहे. मात्र, इतकं सगळं होऊनही प्रेयसीनं हार मानली नाही. ही तरुणी पोलीस (Gaya Police) ठाण्यात पोहोचली आणि तिनं पोलिसांना सर्व परिस्थिती सांगितली. यानंतर पोलिसांनी प्रियकराच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला, यानंतर प्रियकर ठाण्यात हजर झाला. मग पोलिसांनी याप्रकरणी निर्णय घेत दोघांचंही पोलीस ठाण्यातच लग्न लावलं. गया येथील महिला ठाण्यात 75 व्या स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा केला जात होता. याच दरम्यान एक महिला ठाण्यात आली आणि प्रेमात मिळालेल्या धोक्याची कहाणी पोलिसांना सांगू लागली. भयंकर! तब्बल 15 वेळा केला चाकूनं हल्ला नंतर फोडले डोळे; महिलेसोबत अमानुष कृत्य महिला पोलिसानं सांगितलं, की ठाण्यात आलेली प्रेयसी शिवानी हिनं सांगितलं, की प्रियकर नितीश कुमारनं तिला धोका दिला आहे. लग्नाचं आमिष देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, मात्र, यानंतर ती गर्भवती झाल्यावर प्रियकरानं लग्नाला नकार दिला. तरुणीनं पोलिसांनी सांगितलं, की तिच्या प्रियकरानं तिला लग्नाचं वचन दिलं होतं. मात्र, नंतर तो पलटला. याचदरम्यान ती गर्भवती झाली. अचानक तिची प्रकृती खराब झाल्यानं घरचे लोक तिला रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी जेव्हा ही तरुणी गरोदर असल्याचं सांगितलं, तेव्हा कुटुंबीय चिंतेत पडले. दारुड्या पतीला जेवू घातले, औषध पाजले आणि दिला वीजेचा शॉक, पत्नीविरुद्ध गुन्हा या प्रकरणात तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी प्रियकर नितीश कुमार याला समजावलं. यानंतर पोलीस ठाण्यातच दोघांचा विवाह करण्यात आला. पोलिसांनी सांगितलं, की दोघं गेल्या 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. तरुणी गर्भवती होती. दोघांचंही पोलीस ठाण्यातच लग्न लावण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.