छपरा (बिहार), 16 ऑगस्ट: छपरा इथल्या एका महिलेसोबत अमानुष कृत्य (Crime news) करण्यात आलं आहे. शेळीसाठी चारा घ्यायला गेलेल्या महिलेला इतकी वाईट वागणूक देण्यात आली. तब्बल 15 वेळा केला चाकूनं हल्ला केल्यानंतर तिचे डोळे फोडण्यात (Attacked on woman) आले आहेत यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
घटना छपरा जिल्ह्यातील बनियापूर भागातील आहे. नेहमीप्रमाणे ती महिला शेळीचा चारा घेण्यासाठी बागेत गेली. बराच वेळ महिला घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.मात्र महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि जेव्हा पोलिस आले तेव्हा त्यांनाही मृतदेहाची स्थिती पाहून धक्का बसला. महिलेवर आधी चाकूने अनेक वार करण्यात आले आणि नंतर तिचा डोळाही फोडण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पाहून महिलेसोबत दुष्कर्म झाल्याचा संशय आहे तरी वैद्यकीय अहवालानंतरच याची पुष्टी होईल. ज्या प्रकारे महिलेला चाकूने भोसकण्यात आले आहे, त्यावरून असे दिसते की महिलेने शेवटच्या श्वासापर्यंत प्रतिकार केला आहे. यामुळे मारेकरी संतापला आणि त्याने पोट, छाती, मान आणि तोंडावर किमान 15 वेळा चाकूने वार केले.
हे वाचा - प्रेमविवाह केल्याचा बापाला राग, पेपर-कटरनं मुलीची मान कापण्याचा प्रयत्न
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा स्थानिकांनी तीव्र विरोध केला. लोकांनी सांगितले की जोपर्यंत मारेकरी पकडले जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह तेथून उचलू दिला जाणार नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचल्यावर त्यांनी गावकऱ्यांचे मन वळवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस अद्याप पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहेत जेणेकरून मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. हत्येमागील कारण काय होते आणि आरोपी कोण हे अद्याप समजू शकलेले नाही.
महिलेवर बलात्कार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पोलिस बलात्काराची पुष्टी करण्यास सांगत आहेत. या घटनेत किती लोकांचा सहभाग होता हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीने पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पोलीस गुन्हा दाखल करत असून मारेकऱ्याचा शोध घेत आहेत..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime