जयपूर, 16 ऑगस्ट : दारुड्या पतीकडून (Addicted husband) रोज होणारी मारहाण (beating) आणि अत्याचाराला कंटाळून एका महिलेने पतीला वीजेचा जोरदार झटका (wife give electric shock to husband) दिल्याची घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत घरी आलेल्या पतीला जेवायला वाढून त्याला गुंगीचं औषध तिने दिलं. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला जोरदार शॉक दिला.
मारहाणीचा संताप
राजस्थानमधील चुरूमध्ये राहणाऱ्या सुमनचं 15 वर्षांपूर्वी महेंद्रदान नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या काही वर्षांपासून महेंद्रदान रोज दारू पिऊन घरी येत असे. घरी आल्यानंतर त्याची सुमनशी वादावादी होत असे आणि तो सुमनला मारहाण करत असे. रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या सुमननं पतीला धडा शिकवायचं ठरवलं. त्यासाठी त्याला वीजेचा शॉक देण्याची कल्पना तिला सुचली.
असा दिला शॉक
12 ऑगस्टला रात्री साडेआठच्या सुमाराला महेंद्रदान दारू पिऊन घरी आला. त्यानंतर सुमननं त्याला जेवायला वाढलं आणि दुधातून गुंगीचं औषध दिलं. महेंद्रदान बेशुद्ध झाल्यानंतर सुमननं त्याच्या हाताला आणि पायाला वीजेच्या तारा गुंडाळल्या. स्वतःच्या हातात प्लॅस्टिकची पिशवी घेतली आणि पतीला शॉक द्यायला सुरुवात केली. दारू आणि गुंगीच्या औषधामुळे बेशुद्ध असणाऱ्या पतीला त्यामुळे जाग आली आणि वीजेच्या शॉकमुळे तो जोरजोरात ओरडू लागला. ते पाहून सुमनला पतीची दया आली आणि तिनं शॉक देणं थांबवलं.
हे वाचा -टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने पळवली बाईक, एक तास वाट पाहून मालकाची तक्रार
शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना बोलावून सुमननं महेंद्रदानला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. महेंद्रदाननं सुमनविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोघांचेही जबाब नोंदवले आहेत. पतीकडून सतत अत्याचार होत असल्यामुळेच आपण हे पाऊल उचलल्याचं सुमननं सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.