Home /News /viral /

दोन वेळच्या अन्नासाठी सुरू होता संघर्ष; एका पेन्टिंगनं बदललं महिलेचं नशीब, रातोरात झाली करोडपती

दोन वेळच्या अन्नासाठी सुरू होता संघर्ष; एका पेन्टिंगनं बदललं महिलेचं नशीब, रातोरात झाली करोडपती

किचनमधील हे पेंटिंग धुरामुळे काळं होत होतं. मात्र, ही सामान्य पेंटिंग नव्हती. हे तेराव्य शतकातील दुर्मिळ पेंटिंग होतं.

    नवी दिल्ली 15 सप्टेंबर : असं म्हणतात की देणारा जेव्हा काही देतो तेव्हा भरभरून देतो. याचाच प्रत्यय फ्रान्समध्ये (France) राहणाऱ्या एका महिलेला आला. या महिलेचं आयुष्य अतिशय गरिबीत जात होतं. अनेकदा तर या महिलेकडे खाण्या-पिण्यासाठीही पैसे नसत. मात्र, या महिलेला थोडाही अंदाज नव्हता की तिच्या घरात करोडो रुपयांचा खजिना पडलेला आहे, तोही तिच्याच डोळ्यांसमोर. महिलेच्या घरातच करोडो रुपयांची किमती वस्तू (Painting Worth Millions) ठेवलेली होती. तिला या गोष्टीही भनकही नव्हती. Mobile App च्या मदतीने वीजेची बचत, घरही होणार Smart Home! ही घटना फ्रान्सच्या (France) उत्तर भागातील कॉम्पॅनियन येथून समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एक वृद्ध महिलेच्या घरातील किचनमध्ये अनेक वर्षांपासून एक पेन्टिंग (Kitchen Painting) लटकलेली होती. घरातील कोणत्याच सदस्याला या गोष्टीची कल्पना नव्हती की एक दिवस हीच पेन्टिंग त्यांचं नशीब पलटून टाकेल. किचनमधील हे पेन्टिंग धुरामुळे काळं होत होतं. मात्र, ही सामान्य पेंटिंग नव्हती. हे तेराव्य शतकातील दुर्मिळ पेन्टिंग होतं. जी तब्बल 188 कोटी रुपयात विकली गेली. या गरीब महिलेची ओळख लपवली गेली आहे. मात्र, असं सांगण्यात येत आहे, की तिच्याशिवाय घरातील कोणत्याच सदस्याला या पेंपेन्टिंगच्या किमतीचा अंदाज नव्हता. महिलेनं अनेकदा म्हटलं होतं, की ही पेन्टिंग फार खास असावी. मात्र, कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. या वर्षीच महिलेनं आपलं जुनं घर बदललं तेव्हा तिच्या घरातील फर्निचर विकत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीची नजर या पेन्टिंगवर पडली आणि महिलेचं नशीबच बदललं. 40 वर्ष जंगलात राहिला, शहरात आल्यावर 8 वर्षात मृत्यू, 'रियल' टारझनची शोकांतिका! या व्यक्तीनं महिलेला सांगितलं, की ही साधी पेन्टिंग नाही. हे 13 व्या शतकातील आर्ट आहे जे चिमाबूए आर्टिस्टनं तयार केलं आहे. तो आपल्या काळातील प्रसिद्ध आर्टिस्ट होता. तो लाकडाच्या तुकड्यावर पेन्टिंग करत असे. मात्र, त्यानं आपल्या कोणत्याच आर्टवर्कवर सही केलेली नव्हती. मात्र, तरीही या व्यक्तीला खात्री होती की ही पेन्टिंग त्यात आर्टिस्टची आहे. जेव्हा त्यानं ही पेंटिंग अॅक्टऑन लिलाव सेंटरमध्ये दाखवली तेव्हा या गोष्टीची खात्री पटली. ही पेन्टिंग नंतर 188 कोटी रुपयांत विकली गेली. सध्या महिलेला यातील काही भाग मिळाला आहे. मात्र, महिन्याच्या शेवटपर्यंत तिला पूर्ण रक्कम मिळेल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Painting, Viral news

    पुढील बातम्या