Home /News /technology /

Mobile App च्या मदतीने वीजेची बचत, घरही होणार Smart Home!

Mobile App च्या मदतीने वीजेची बचत, घरही होणार Smart Home!

घरखर्चामध्ये वीजबिल (Electricity Bill) हा एक मोठा भाग असतो. उन्हाळ्यात पंखे, कूलर, एसी यांपैकी काही तरी वापरावं लागतं. त्यामुळे वीजबिल वाढतं. आता यासाठी जास्त त्रास घेण्याची गरज नाही. एका मोबाइल अॅपद्वारे (Mobile App) हे करणं सहज शक्य होणार आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 15 सप्टेंबर : प्रत्येक सर्वसामान्य माणूस बचतीचा कोणता ना कोणता मार्ग, कोणती ना कोणती क्लृप्ती प्रत्येक बाबतीत शोधून काढत असतो. आपल्या कुटुंबाचा मासिक खर्च कमीत कमी व्हावा, यासाठी त्याची ही धडपड सुरू असते. घरखर्चामध्ये वीजबिल (Electricity Bill) हा एक मोठा भाग असतो. उन्हाळ्यात पंखे, कूलर, एसी यांपैकी काही तरी वापरावं लागतं. त्यामुळे वीजबिल वाढतं. थंडीच्या काळात हीटर किंवा गिझर वापरावा लागतो. त्यामुळे वीजबिल वाढतं. म्हणूनच आपला वीजवापर कमी होऊन कमीत कमी बिल यावं याचे प्रयत्न प्रत्येक नागरिक करत असतो. आता यासाठी जास्त त्रास घेण्याची गरज नाही. एका मोबाइल अॅपद्वारे हे करणं सहज शक्य होणार आहे. एनर्जी हेल्पलाइन (Energy Helpline) नावाची कंपनी ऊर्जेची बचत (Energy Saving) करण्याचं कार्य करत आहे. या कंपनीचे ऊर्जा तज्ज्ञ ताशेमा जॅक्सन म्हणतात, की आपण ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करून तिची बचत करू शकू, आपला खर्च कमी करू शकू अशी एक सुधारणा लवकरच घडून येणार आहे. डेली मेल या वेबसाइटशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं, की लवकरच तंत्रज्ञानाच्या साह्याने वेगवेगळी उपकरणं एकमेकांना जोडता येऊ शकतील. त्यामुळे ती परस्परांना नियंत्रित करू शकतील. या प्रक्रियेलाच इंटरनेट ऑफ थिंग्ज (Internet of Things) असं म्हटलं जातं, यामुळे काही काळातच तुमचं घर स्मार्ट होम होऊ शकेल. ही कंपनी स्मार्ट डिव्हाइस (Smart Device) या संकल्पनेवर काम करते आहे. त्याद्वारे ग्राहक केवळ एका अॅपच्या (Mobile App) माध्यमातून आपल्या घरात ऊर्जेच्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करू शकतील. जेव्हा सौर ऊर्जेचा पर्याय योग्य वाटेल, तेव्हा तो पर्याय वापरला जाईल. जेव्हा पवन ऊर्जेचा पर्याय योग्य वाटेल, तेव्हा त्याद्वारे निर्माण झालेली ऊर्जा वापरली जाईल. त्यामुळे वेगवेगळ्या हंगामांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेचा योग्य वापर करून घरातल्या विजेची बचत करणं शक्य होऊ शकेल. ऊर्जा तज्ज्ञ म्हणतात, की 2050 पर्यंत घरात वापरली जाणारी वीज किंवा ऊर्जेचं जे बिल येईल, तेही स्मार्ट बिल असेल. त्यामुळे ते बिल पाहून ग्राहकाला नेमका अंदाज येईल, की घरातल्या कोणत्या उपकरणाला सर्वांत जास्त वीज लागते आहे आणि कोणतं उपकरण कमी वेळ चालवून आपल्याला वीज वाचवता येऊ शकेल, हेही प्रत्येकाला समजू शकेल. त्यामुळे ग्राहक प्रत्येक महिन्यातच घरातल्या विजेची बचत करू शकतील. त्यामुळे साहजिकच त्यांचं बिल कमी येईल. ही सुविधा सुरू करण्यासाठी वार्षिक सात हजार रुपये खर्च येऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. घरांना स्मार्ट होम (Smart Home) बनवण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाला हातभार लागू शकतो.
First published:

Tags: Mobile app

पुढील बातम्या