जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रात्री गाढ झोपलेल्या व्यक्तीसमोर अचानक आलं 'भूत', पुढे काय घडलं? पाहा Viral Video

रात्री गाढ झोपलेल्या व्यक्तीसमोर अचानक आलं 'भूत', पुढे काय घडलं? पाहा Viral Video

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मुंबई २६ नोव्हेंबर : सोशल मीडियाच्या या जगात आपल्याला इतके फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात की ते पाहण्यात वेळ कसा निघून जातो? हे लोकांना कळत नाही. येथे लोक फॉलोअर्स वाढवण्यासाठी वेगवेगळी शक्कल लावून व्हिडीओ तयार करत असतात, जेणे करुन त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढेल आणि ते लोकांचं मनोरंजन करु शकतील. अशात सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो तसा पहिल्या नजरेत भयानक वाटत आहे. पण फारच मनोरंजक आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भूत बनला आहे आणि लोकांना घाबरवत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई २६ नोव्हेंबर : सोशल मीडियाच्या या जगात आपल्याला इतके फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात की ते पाहण्यात वेळ कसा निघून जातो? हे लोकांना कळत नाही. येथे लोक फॉलोअर्स वाढवण्यासाठी वेगवेगळी शक्कल लावून व्हिडीओ तयार करत असतात, जेणे करुन त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढेल आणि ते लोकांचं मनोरंजन करु शकतील. अशात सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो तसा पहिल्या नजरेत भयानक वाटत आहे. पण फारच मनोरंजक आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भूत बनला आहे आणि लोकांना घाबरवत आहे. अशातच हा भूत बनलेला व्यक्ती रस्त्यावर झोपलेल्या एका व्यक्तीला घाबरवण्याचा प्रयत्न करते. हा व्हायरल व्हिडीओ तुम्हाला नक्कीच पोट धरुन हसायला लावेल. हे ही पाहा : पहाटे ३ वाजता हॉस्पिटलमध्ये ‘भूताची एन्ट्री’? Viral Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका हात रिक्षावर झोपली असते, तेव्हा तेथे भूताच्या वेशात एक व्यक्ती येते. या व्यक्तीने काळे कपडे आणि पांढला मास्क घातला आहे. तसे तर हे खोटं असल्याचं लक्षात येत आहे. पण तो ज्यापद्धतीवने समोर आला हे पाहून तर कोणीही घाबरेल. त्यात ती रिक्षीवरील व्यक्ती झोपेत असल्यामुळे तिचं घाबरणं सहाजिकच आहे. पण असं असलं तरी देखील, भूताला पाहून आधी ही व्यक्ती दचकते आणि जोरजोरात ओडते. पण काही सेकंदात तो भूत खोटा असल्याचं तिच्या लक्षात येतं आणि ती व्यक्ती या भूताला मारू लागते.

जाहिरात

काही सेकंदाच्या या व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर planet_visit नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडीओ मनोरंजक असला तरी देखील, असे अनेक लोक आहेत, जे या व्हिडीओवर टीका देखील करत आहेत. एखाद्या व्यक्तीला झोपेत असं त्रास देणं चुकीचं आहे असं अनेकांचं मत आहे. तर अशा कृत्यामुळे कोणालाही हार्ट अटॅक देखील येऊ शकतं असं अनेकांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात