मुंबई, 27 नोव्हेंबर : मासा म्हणताच कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. डोळ्यासमोर माशाचं सार किंवा कालवण आणि तळलेले कुरकुरीत मासेच आले असतील. पण जरा विचार करा, जर असा तुमच्या ताटातील मासा अचानक जिवंत झाला तर काय होईल... हे शक्यच नाही तुम्ही म्हणाल. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका प्लेटमध्ये सर्व्ह करण्यात आलेला मासा अचानक जिवंत झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. यात दिसतं की जेवणाच्या प्लेटमध्ये ठेवलेला मासा अचानक आपलं तोंड उघडतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेवणाच्या प्लेटमध्ये सलाडसोबत काही मासे ठेवले गेले आहेत. सुरुवातीला पाहताना हे मासे मृत असल्याचं वाटतं. मात्र ही डीश खाणाऱ्या व्यक्तीला यात काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं.
हे वाचा - OMG! पाण्यात जिवंत फिरताना दिसला डोकं कापलेला मासा; व्यक्तीने हात लावताच...; पाहा VIDEO
हा व्यक्ती आपल्या हातातील लाकडी काटा या माशाच्या तोंडाजवळ घेऊन जातो. इतक्यात मासा अचानक आपलं तोंड उघडतो आणि हा काटा जोरात आपल्या दातांनी पकडतो. यादरम्यान हा व्यक्ती माशाच्या तोंडातून काटा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, मात्र मासा हा काटा सोडायला तयार नसतो. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. प्लेटमधील मासा अचानक जिवंत होऊन आपलं तोंड उघडत असल्याचं दृश्य याआधी कदाचित तुम्ही कधीही पाहिलं नसेल.
भारतात लोक सहसा मांस आणि मासे भाजून किंवा योग्य प्रकारे शिजवल्यानंतर खातात. पण जगात असे अनेक देश आहेत, जिथे लोक कच्चा मासा खाण्यासही धजावत नाहीत. परदेशांत अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट पाहायला मिळतील, जिथे प्लेटमध्ये अगदी निरनिराळ्या प्रकारचे मासे दिले जातात. अनेकदा तर प्लेटमध्ये जिवंत मासेही दिले जातात.
हे वाचा - दिसताच क्षणी कुत्र्याने तोंडात धरला खतरनाक साप; असा भयानक शेवट की तुम्ही विचारही केला नसेल
@OTerrifying ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने दिलेल्या माहितीनुसार या माशाला एलियनही म्हटलं जातं. जपानमधील हा प्रसिद्ध असा मासा आहे. पण काही जपानी लोकच हा खातात. हा खूप चविष्ट असतो. असं सांगितलं जातं.
Fish served at restaurant bites chopstick😳 pic.twitter.com/NVjq12anrM
— OddIy Terrifying (@OTerrifying) November 23, 2022
तुम्हाला हा असा मासा खायला आवडेल का ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fish, Other animal, Viral, Viral videos