नवी दिल्ली 18 जून : देश कोणताही असो, तिथल्या त्रस्त आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी विलंब न करता पोहोचणं, हे पोलिसांचं काम आहे. असंच काहीसं ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्स पोलिसांसोबतही झालं. मदत मागणाऱ्या महिलेचा आवाज ऐकताच ते धावत तिथे पोहोचले. घराचा दरवाजाही तोडला, पण समोरचं दृश्य त्यांच्या कल्पनेच्या पलीकडील होतं (Weird Incident). OMG! लुंगी घातलेल्या 64 वर्षांच्या आजोबांनी असं काही केलं की समोर उभा तरुणही शॉक; VIDEO पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्यांना घरातून एका वृद्ध महिलेचा आवाज येत असल्याची माहिती मिळाली होती, जी मदतीसाठी याचना करत होती. याबद्दल माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र जेव्हा त्यांना सत्य समजलं तेव्हा त्यांनाही विचित्र वाटलं.
HullLive च्या रिपोर्टनुसार, वेस्ट मिडलँड्समध्ये संध्याकाळी 7.30 च्या सुमारास एका घरातून वाचवा-वाचवाचा आवाज येत होता. हा आवाज ऐकून कोणीतरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच वेस्ट मिडलँड्स फोर्स रिस्पॉन्सने कारवाई केली आणि ते त्वरीत घराजवळ पोहोचले. पोलिसांनाही वृद्ध महिलेचा हा आवाज आला आणि त्यांनी घराचा बंद दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. 23 वर्षांची मुलगी अन् 22 राजेनामे! असा सुरु केला स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या ही घटना वेस्ट मिडलँड्स फोर्स रिस्पॉन्सने स्वतः ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस अधिकारी घरात पोहोचले तेव्हा लिविंग रूममध्ये कोणी महिला नसून पिंजऱ्यात बंदिस्त पोपट होता. अकाऊंटवरून एका पोलीस अधिकाऱ्याचा पोपटासोबतचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. घरमालकाचा मुलगा जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा त्यानं स्वतः सांगितलं की हा आवाज त्याच्या आईचा नाही, तर हा पोपट नेहमीच असा आवाज काढत राहातो. त्याला माणसांची नक्कल करायला आवडते आणि तो माणसांप्रमाणेच बोलतो..